BJP on MNS Municipal Corporation Hall Letter Thackeray Group | Ashish Shelar | Aditya Thackeray | मनसेने ठाकरे गटाला निमंत्रण दिल्याने भाजप नाराज: ​​​​​​​प्रतिपालिका सभागृहाला हजेरी लावण्यास नकार; ठाकरेंवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप – Mumbai News

0

[ad_1]

मनसेने आज मुंबईतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्रतिपालिका सभागृह भरवण्याची घोषणा केली आहे. यासाठी मनसेने ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिले आहे. पण भाजपने ठाकरे गटावर मुंबई महापालिकेत 25 वर्षांपासून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत या सभागृह

.

मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मनपा निवडणूक रखडल्यामुळे प्रतिपालिका भरवून मुंबईतील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हे सभागृह मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवनात भरणार आहे. मनसेने या कार्यक्रमाचे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व भाजपचे नेते आशिष शेलार यांना निमंत्रण दिले होते. पण भाजपने ठाकरे गटाला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्यामुळे त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. ज्या उबाठा गटाने गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबावत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल? असा प्रश्न भाजपने आपल्या नकारघंटेच्या पत्रात उपस्थित केला आहे.

खाली वाचा भाजपचे पत्र जशास तसे

भाजपने आपल्या पत्रात म्हटले आहे की, ज्या उबाठा गटाने गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबावत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल? असा स्वाभाविक प्रश्न आमच्या पक्षांतर्गत चर्चेअंती उपस्थित झाला. मुंबईकरांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मुंबईचे मंत्री महोदय, आमदार, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व आम्ही सर्व भाजपा नगरसेवक सातत्याने रस्त्यावर उतरून सातत्याने प्रयत्नशील आहोतच.

मुंबईतील रस्त्यांच्या दर्जाबाबत आणि कामात होणाऱ्या विलंबाबाबत भाजपा आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाची प्रदीर्घ बैठक घेऊन दि. ३१ मे २०२५ पूर्वी चालू कामे पूर्ण करण्याचे सकारात्मक निर्देश दिलेले आहेत. दरवर्षी प्रशासनाच्या बाले सफाईबाबतच्या दाव्याची प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. आशिष शेलार, पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, सह पालकमंत्री हे आरोग्य, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, महापालिका विविध प्रकल्प वाक्षाबत वेळोवेळी आढावा बैठका घेत आहेत.

वरील वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिका प्रतिसभागृहात २५ वर्षे पराकोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजपा रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी प्रमाणेच सातत्याने अग्रेसर व कटिबद्ध राहील. पुनश्च एकदा आपल्या निमंत्रणाबद्दल आभार, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

आता पाहू मनसेने पाठवलेले पत्र

तत्पूर्वी मनसेने राजकीय पक्षांना पाठवलेल्या आपल्या पत्रात म्हटले होते की, मुंबई महानगरपालिका ही दोन चाकांवर चालते. एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी, पण गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकयतिनिधी हे चाक बंद झाले आहे. मुंबईत अनेक समस्या आहेत, ज्यावर चर्चा व्हावी, मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ह्या पर्चा होत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा पडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत.

ज्यामध्ये विविध राजकीय संकटना, राजकीय प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी. महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे चर्चचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here