.
अमरावती तालुक्यातील शिराळा येथील प्रयोगशील शेतकरी संजय लव्हाळे व उज्वला लव्हाळे यांचा अकोला येथील महाबीजच्या कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त बीज उत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाबीजच्या वतीने अकोला येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा सोहळा महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या प्रसंगी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह व डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पीडीकेव्ही अकोला यांच्या प्रमुख उपस्थिती तर महाबीजचे संचालक वल्लभ देशमुख व डॉ. रणजित सपकाळ, अंकुश माने, संचालक, बीज प्रमाणीकरण यंत्रणा अकोला यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी मागील दोन वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेले बीजोत्पादक संजय गुणवंत लव्हाळे तसेच शेतकरी, महाबीज विक्रेते, महाबीज अधिकारी कर्मचारी यांना महाबीज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कळवण्यात आली आहे.
अमरावती तालुक्यातील शिराळा येथील प्रयोगशील शेतकरी संजय लव्हाळे व उज्वला लव्हाळे यांचा अकोला येथील महाबीजच्या कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त बीज उत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार केला.