[ad_1]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का?’ असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अशा प्रकारची विधाने करून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर
.
विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पहलगाम हल्ल्याविषयी वादग्रस्त विधान केले. अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारून गोळीबार करण्याएवढा वेळ कुठे असतो? असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या या विधानाचा तिखट समाचार घेतला. अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आत्ता नातेवाईकांच्या म्हणणे माध्यमांनी जाहीरपणे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अतिरेक्यांनी धर्म विचारून मारले. त्यामुळे वडेट्टीवारांनी असे विधान करू नये. ते तिथे घटनास्थळी होते का? इथे बसून अशी विधान करणे हे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही. माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत, असे ते म्हणाले.
राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यात यश आल्याचेही सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणी अद्याप आकडा स्पष्ट झाला नाही. पण पोलिस विभाग लवकरच हा आकडा जाहीर करेल. पण मी स्पष्ट करतो की, जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर गेले पाहिजेत, अशा सर्व नागरिकांची ओळख पटवण्यात आली, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. त्यांची आकडेवारी लवकर सांगितली जाईल. पण केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीतील कोणताही नागरिक आम्हाला सापडला नाही असे नाही.
मंत्री त्यांना झालेल्या ब्रिफिंगच्या आधारावर बोलतात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे विधान केले होते. पत्रकारांनी यावेळी फडणवीसांना छेडले असता त्यांनी अशी कोणतीही बाब नसल्याचे स्पष्ट केले. अनेकदा मंत्री त्यांना झालेल्या ब्रिफिंगच्या आधारावर बोलत असतात. म्हणूनच मी काल गृहमंत्री म्हणून यासंबंधीची ऑथेंटिक माहिती दिली. मी पुन्हा एकदा सांगतो. जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजे, अशा सर्वच नागरिकांची ओळख पटली आहे, असे ते म्हणाले.
जे पाकिस्तानी नागरिक म्हणजे सिंधी समाजाचे लोक लाँग टर्म व्हिसावर आलेत, त्यांनी नागरिकत्वासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांना केंद्राच्या आदेशांतर्गत भारत सोडण्याचे कारण नाही. पण जे लोक शॉर्ट टर्म व्हिसावर आलेत, त्यांना 48 तासांत भारत सोडण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी पूर्ण नेटाने पार पाडली आहे, असे ते म्हणाले.
बुलेट ट्रेन प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्राच्या महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रातील हिस्सा 2028 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वासही व्यक्त केला. बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हद्दीतील काम 2028 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. या मुदतीनुसार या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम निर्णय घेऊन बंद पाडले होते. या कामाच्या बाबतीत आपण अडीच वर्षे मागे गेलो आहोत. आपण या प्रकल्पावर 70-80 हजार कोटी रुपये गुंतवणार आहोत. त्यातच हे काम अडीच वर्षे बंद ठेवणे हे परवणारे नव्हते. त्याच्या खर्चाचा भार आपल्यावरच पडणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयामुळे गुजरातमधील बुलेट ट्रेनचे काम खूप पुढे गेले. आपण मागे राहिलो. पण नवे सरकार आल्यानंतर तत्काळ सगळ्या मान्यता दिल्या, अतिशय वेगाने ते काम सुरू केले. मागील अडीच वर्षांत हे काम खूप वेगाने सुरू असून, हे काम आता नव्या टाईमलाईनमध्ये पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, ईडीच्या कार्यालयाला लागलेल्या आगीत सर्वच महत्त्वाचे दस्तावेज सुरक्षित असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.
[ad_2]