[ad_1]
पुण्यातील रुबी हाॅल क्लिनिकने राज्यातील पहिलया फ्रेनिक नर्व्ह न्यूराेमाेडयुलेशन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करत वैद्यकीय यश मिळवले अाहे. रुबीचे न्यूराे ट्राॅमा युनिटचे प्रमुख डाॅ.कपिल झिरपे यांच्या तज्ञ देखरेखीखाली न्यूराेसर्जन डाॅ.मनीष बलदिया या
.
२५ जुलै २०२४ रोजी बाथरूममध्ये पडल्यामुळे संजय पै यांना मणक्याला दुखापत (सी3-सी4 फॅक्चर- मणक्याच्या मध्यभागी असलेल्या कशेरुका) झाली होती, त्यांच्यावर सुरुवातीला दुसऱ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. सी 4 कॉर्पेक्टॉमी (सी4 पातळीवर असलेल्या कशेरुका शस्त्रक्रियेने काढण्याची प्रक्रिया), सी3-सी4 डिसेक्टॉमी (मणक्यामधील सी3-सी4 पातळीच्या कशेरुकांमधील चकत्या काढून टाकण्याची प्रक्रिया) आणि स्पाइनल फ्यूजनच्या ( मणक्यामधील कशेरुका जोडण्याची प्रक्रिया) अनेक शस्त्रक्रिया करूनही, ते क्वाड्रिप्लेजिक ( हातापायाच्या हालचाली न होणे / पक्षघात) स्थितीत होते आणि व्हेंटिलेटरवर अवलंबून राहिले. जरी मेंदूत कोणतेही तीव्र बदल दिसून आले नाहीत, तरी इमेजिंग चाचणीतून सी3-सी4 अँटीरियर सबलक्सेशन आणि स्पाइनल कॉर्ड कॉम्प्रेशनची असल्याचे स्पष्ट झाले.
आधुनिक उपचारांची गरज ओळखून, पै यांना १९ सप्टेंबर २०२४ रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये मज्जासंस्थेच्या कार्यावर देखभाल करण्यासाठी, व्हेंटिलेटर सपोर्ट आणि पुनर्वसन यासह पुढील व्यवस्थापनासाठी हलवण्यात आले. जेव्हा ते रुग्णालयात आले तेव्हा ते व्हेंटिलेटरवर अवलंबून व शुद्धीवर होते, त्यांना पोटात नळीद्वारे पोषक अन्न दिले जात होते आणि अँटीबायोटिक थेरपी सुरु होती.
व्हेंटिलेटरशी संबंधित न्यूमोनिया, स्ट्रेस अल्सर, डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम यासारख्या दीर्घकाळ व्हेंटिलेटर वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर धोके लक्ष्यात घेऊन, रुबी हॉल क्लिनिकमधील वैद्यकीय टीमने (डॉ. रिचा सिंग, डॉ.मनीष बलदिया, त्यांच्या आयसीयू टीमसह डॉ. झिरपे आणि डॉ. परवेझ ग्रँट)फ्रेनिक नर्व्ह न्यूरोमोड्युलेशन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही प्रगत शस्त्रक्रिया श्वासोच्छवासासाठी आवश्यक असलेल्या प्रमुखस्नायू डायफ्रामला उत्तेजित करत मणक्याच्या दुखापतींमुळे मज्जातंतूमध्ये कमकुवतपणा असलेल्या रुग्णांसाठी एक आवश्यक उपाय प्रदान करते.
न्यूरोसर्जन डॉ.मनीष बलदिया म्हणाले, व्यापक प्रयत्न करून देखील व्हेंटिलेटरचे अवलंबत्व काढणे कठीण जात होते,परंतु फ्रेनिक नर्व्ह स्टिम्युलेशन शस्त्रक्रियेनंतर लगेचच आम्हाला त्यांच्या श्वासोच्छवासात उल्लेखनीय सुधारणा दिसून आली.ही एक अत्यंत नाजूक आणि दुर्मिळ प्रक्रिया होती. यामध्ये आम्ही फ्रेनिक नव्र्व्हजवळ(श्वसनाचे प्राथमिक स्नायू असलेल्या डायाफ्रामवर (छिद्रपटल) नियंत्रण ठेवून श्वासोच्छवासात महत्त्वाची भूमिका बजावणारी एक प्रमुख मज्जातंतू) एक लहान उपकरण ठेवले. या उपकरणाच्या मदतीने,आम्ही रुग्णाचे डायाफ्राम रिमोटद्वारे बाहेरून सक्रिय करत नियंत्रित करू शकलो आणि व्हेंटिलेटरचा अवलंब कमी करण्याची प्रक्रिया सुरु करू शकलो.
[ad_2]