[ad_1]
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…
.
मनोज जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा, लक्ष्मण हाके काढणार लाँग मार्च
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे, प्रत्तुत्तरात ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके देखील लॉंग मार्च काढणार आहे. ज्या दिवशी मनोज जरांगे मुंबईला निघणार त्याच दिवशी ओबीसींचा नांदेड ते मुंबई लॉंग मार्च काढणार, अशी माहिती हाके यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर ‘वर्षा’ बंगल्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अखेर अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. बीकेसीमधील वेव्हज परिषदेचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट पार पडणार आहे. एस. जयशंकर, अश्विनी वैष्णवसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
पहलगाम हल्ल्यापू्र्वी जालन्याच्या तरुणाला अतिरेकी भेटले?
जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला गेलेल्या एका तरुणाने पहलगाम हल्ला करणारे अतिरेकी हल्ल्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला भेटल्याचा मोठा दावा केला आहे. या तरुणाने आपल्या दाव्याची माहिती एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही दिली आहे.
जालन्यातील संजय राऊत हे आपला मुलगा आदर्श व पत्नीसोबत काश्मीरला फिरण्यास गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहलगामला गेले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 एप्रिल रोजी बैसरनच्या पठारावर अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह एकूण 26 पर्यटक मारले गेले. आत्ता संजय राऊत यांच्या आदर्श या मुलाने या हल्ल्याविषयी मोठा खुलासा केला आहे. सविस्तर वाचा
अक्षय्य तृतीयेला सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण
आज म्हणजेच ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ३२२ रुपयांनी घसरून ९५,६८९ रुपयांवर आली आहे. पूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹९६,०११ होती.
त्याच वेळी, आज एक किलो चांदीची किंमत ₹१,३४० ने कमी होऊन ₹९६,०५० प्रति किलो झाली आहे. पूर्वी चांदीची किंमत प्रति किलो ₹९७,३९० होती. २१ एप्रिल रोजी सोन्याने ९९,१०० रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. सविस्तर वाचा
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची जागा घेतील. फणसाळकर आज पोलिस दलातून निवृत्त होणार आहेत. सविस्तर वाचा
मनोज जरांगे पाटलांचे पुन्हा ‘चलो मुंबई’
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली. 29 ऑगस्ट रोजी मी मुंबईत उपोषणाला बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. ते तिथे मला फक्त नेऊन सोडण्यासाठी आले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा
पहलगामधील हल्ला हा देशावरील हल्ला- शरद पवार
पहलगामध्ये झालेला हल्ला हा या देशावरील हल्ला आहे. ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशासाठी दिलेली किंमत आहे. त्यामुळे या ठिकाणी धर्म, जात, पात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. भारतीयांवर हल्ला कोणत्याही शक्ती करत असतील, तर देश वासियांना देखील कशाचीही अपेक्षा न करता एकत्र राहावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी धर्म विचारुन हल्ला झाला नसल्याच्या त्या वक्तव्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर वाचा
पुण्यातील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरण
पुण्यातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात सिनिअर्स विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांवर 6 महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. सविस्तर वाचा
रत्नागिरीमध्ये 16 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली
रत्नागिरी: समुद्रात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या 16 जणांची बोट अचानक उलटल्याची घटना मंगळवारी घडली. बोटीत अचानक बिघाड झाल्याने आणि समुद्र खवळलेला असताना या बोटीने नियंत्रण गमावले आणि पलटी झाली. मात्र पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले.
राधाकृष्ण विखेंचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही- राऊत
राज्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज आणि कर्जमाफीचा प्रकार समोर आला असून तीन वर्षांपूर्वी आम्ही हा विषय मांडला होता. त्यावेळी माझे डोके ठिकाणावर नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाचा देखील डोके ठिकाणावर नाही? असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील का? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. सविस्तर वाचा
पाकिस्तानला 24 तासात उत्तर द्यायला हवे होते- राऊतांची टीका
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, याला म्हणतात नेतृत्व. आता देखील पाकिस्तानला 24 तासाच्या उत्तर द्यायला हवे होते, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात कोणावर कारवाई करायची असेल तर ती देशाच्या गृह विभागावर कारवाई करा. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, मात्र सरकारच्या चुकांच्या पाठीशी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या शुभदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी भव्य सजावट केलेली आहे. ही आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
वेरका आणि मदर डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले
देशभरात मदर डेअरी आणि वेर्का ब्रँडने दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. बुधवार, ३० एप्रिलपासून नवीन किमती लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर, मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत आता प्रति लिटर ६९ रुपये झाली आहे, तर टोन्ड दुधाची किंमत ५४ रुपयांवरून ५६ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
सेन्सेक्स 100 अंकांनी घसरून 80,200च्या पातळीवर
आज म्हणजेच ३० एप्रिल रोजी, आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजार खाली आहे. सेन्सेक्स १०० अंकांनी घसरून ८०,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील सुमारे २० अंकांनी खाली आला आहे, तो २४,३०० वर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्समधील ३० पैकी १५ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्सचे शेअर्स ५.५% ने घसरले. त्याच वेळी, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एसबीआय आणि झोमॅटोचे शेअर्स ३% पर्यंत घसरले आहेत. पॉवर ग्रिड १% वर आहे.
[ad_2]