Nashik Crime News Filmy Style Escape Accused Cctv Video Viral | Nashik Accused Escape | Nashik News | आरोपीने पोलिस ठाण्यातून फिल्मी स्टाईलने ठोकली धूम: पोलिसांच्या हाताला झटका देत दुचाकीवर बसून पलयान, 24 तासांत अटक – Nashik News

0

[ad_1]

नाशिकमध्ये एका आरोपीने फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या हाताला झटका देऊन मित्राच्या गाडीवर बसून पळ काढला. पोलिस आरोपीच्या मागे धावत राहिले पण त्याला पकडू शकले नाही. मंगळवारी दुपारी 1 वाजता भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला होता. या घटनेचे सी

.

मिळालेल्या माहितीनुसार, काठे गल्लीतील युवकावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित आरोपी क्रिश शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी क्रिश शिंदे याला पोलिस नेत असताना त्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलिस व्हॅनमधून पळ काढला होता. त्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या मित्रासोबत दुचाकीवरून फिल्मी स्टाईलने फरार झाला. हा सर्व प्रकार भद्रकाली पोलिस ठाणे परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आरोपी पोलिस व्हॅनमधून कसा पळून जात आहे आणि त्याचा साथीदार बाईक घेऊन येतो. आरोपी धावतच मित्राच्या बाईकवर उडी मारून बसतो. पोलिस त्याच्या मागे धाव घेतात, पण त्याला पकडू शकत नाहीत.

या प्रकारानंतर भद्रकाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सजग झाले. सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. संशयित क्रिश शिंदे आणि त्याला पळून जाण्यास मदत करणारा इसम यांचा नाशिक शहर व परिसरात कसून शोध घेण्यात आला. या दरम्यान क्रिशला मदत करणारा किरण युवराज परदेशी (रा. कथडा, नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून क्रिशने वापरलेली मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशीत किरणने क्रिश शिंदेला रात्रीच्या वेळी आडगाव शिवारातील निलगीरी बाग परिसरात सोडल्याची कबुली दिली. मात्र, त्यानंतर तो कुठे गेला, याबाबत काही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

हॉटेलमध्ये जेवत असताना पोलिसांनी आरोपीला पकडले

आरोपीचा ठावठिकाणा मिळवणे कठीण जात असतानाही, पोलिसांनी तांत्रिक मदतीसह मानवी खबऱ्यांचा उपयोग करून तपास सुरू असताना क्रिश शिंदे हा इगतपुरी शिवारातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेत आरोपी क्रिश शिंदेला फरार झाल्याच्या 24 तासात बेड्या ठोकल्या.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here