[ad_1]
महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे बदल होताना दिसत आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत असतील, तर कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शर
.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या म्हणाल्या, ठाकरे आणि पवारांचे सहा दशकांपासून प्रेमाचे संबंध आहेत. त्यांनी टोकाची राजकीय भूमिका सुद्धा घेतलेली आहे. परंतु कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूने जपले गेले आहेत. ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत. उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही मला भावा समान आहेत. ते दोघे एकत्र येत असतील, महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मनाचा मोठेपणा दाखवत असतील, तर कौतुकास्पद आहे. एखादे कुटुंब एकत्र येत असेल आणि राज्याचे चांगले होणार असेल तर कोणताही व्यक्ती त्याचे स्वागत करेल. मतभेद हे असले पाहिजे, मात्र मनभेद असू नये. तसेच राज आणि उद्धव दोन्ही माझ्याहून मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांना कसा सल्ला देणार?, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
महिलांच्या अश्रूंवर या सरकारचा महाल उभा
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी, पाणी या विषयांवर गांभीर्याने विचार करायला हवा. सरकारकडून माझ्या अपेक्षा नाही. सगळ्या महिलांच्या अश्रूवर या सरकारचा महाल उभा आहे. त्यामुळे कोणीतरी त्यांना जाब विचारल पाहिजे. त्याची जबाबदारी आपल्यावरही आहे. कारण लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. पक्षावर विश्वास दाखवला आहे. तसेच जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा मी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी व्हावी
जातीय जनगणनाची मागणी आपण केली होती. ती उशिरा का होईना केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्याचे मी मनापासून स्वागत करते. संसदेत महिला आरक्षणाचा बिल आम्ही संमत केला आहे. सर्व गोष्टी 2025-26 पर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे. 2029 मधील लोकसभा निवडणुकीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मे महिन्यात वन नेशन वन इलेक्शनसह इन्कम टॅक्स नवीन कायदा होत आहे. या दोन्ही समितीवर मला काम करण्याची संधी मिळाली आहे.
जगाला आम्ही एक आहोत असा संदेश दिला पाहिजे
पहलगाम हल्ल्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही विरोधी भूमिका घेणार नाही. आम्ही सरकारला याबाबत शब्द दिला आहे. टीका करायला भरपूर संधी आहे. संसदेत या विषयावर ताकदीने बोलेल. पण आता आठ ते दहा दिवस अत्यंत जपून व्यक्त करणार आहे. संसदेत सर्व पक्षांना एकत्र बोलवा. त्यानंतर जगाला आम्ही एक आहोत, असा संदेश देण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.
[ad_2]