[ad_1]
स्वतः मधल्या विश्वासाला जर जिवंत ठेवता आले तर कुठलेच अपयश आपल्याला यशापासून रोखू शकत नाही. प्रयत्न करत असताना हार मिळाली म्हणून न थांबता त्यात सातत्य ठेवले तर यश हे नक्कीच मिळते असे ओंकारच्या बाबतीत घडले आहे. याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदर्श
.
बोल्हेगाव येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ओंकार खुंटाळे यांची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा(यूपीएससी-सीए सइ)२०२४ मध्ये एआयआर-६७३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने,संस्थेचे विश्वस्त माजी सभापती डॉ. घुले यांच्या हस्ते ओंकार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.के.पंदरकर हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.पी.ए.फटांगरे, संगणक विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.ए.शेख,कार ्यालय अधीक्षक श्री.पी.व्ही.दळवी,ऋत िक ताकपेरे,अल्तमश शेख,श्यामा वाळके आदी उपस्थित होते.
सत्कारमूर्ती ओंकार खुंटाळे यावेळी आपले अनुभव व्यक्त करताना म्हणाले, अपयशाने खचून न जाता प्रयत्नांचे सातत्य हेच यशाचे रहस्य आहे.या कॉलेजने राष्ट्रीय सेवा योजना सहभाग तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेली संधी, विविध सांस्कृतिक व शिवजयंती उत्सवानिमित्त सूत्रसंचालनात महाविद्यालयाने मला दिलेली लीडरशिप, महाविद्यालयातून स्वतःचा सामाजिक जाणवेचा आलेख उंचावत गेलेला दिसून आला.
प्राचार्य डॉ. पंदरकर म्हणाले, विद्यार्थी आणि प्राध्यापकांदरम्यानचा संबंध हा शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली आहे.
प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात,त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवतात, तर विद्यार्थी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे पालन करतात, अभ्यास करतात आणि ज्ञान मिळवतात.
या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश वाढते आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. यापुढेही ओंकार सारखे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडले पाहिजे. प्रास्ताविक डॉ.एस.बी.दहातोंडे यांनी, सूत्रसंचालन प्रा.डॉ. के. आर. पिसाळ यांनी, तर आभार प्रा.एस.व्ही.मरकड यांनी मानले.
[ad_2]