Income from musli, panpimpri by the manufacturing company | उत्पादक कंपनीद्वारे मुसळी, पानपिंपरीतून उत्पन्न: जिल्ह्यात पानपिंपरी, विड्याचे पान व मुसळीचे अंजनगाव सुर्जी परिसरात होते उत्पादन‎ – Amravati News

0

[ad_1]

.

पानपिंपरी (लेंडी पिपरी), मुसळी आणि विड्याचे पान या नाजुक व बहुगुणी औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणे सोपे नाही. मर नावाच्या रोगाची एकाही झाडाला लागण झाली तर पूर्ण पान पिंपरीपासून नष्ट होते. त्यामुळे या पिकाचे संरक्षण व त्यापासून उत्पन्न मिळवण्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील उत्पादकांनी स्वत:च पुढाकार घेत उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे.

शासनाकडून या जिल्ह्यातील पान पिंपरीपासून औषधी वनस्पतींसाठी कोणतेही अनुदान किंवा मदत दिली जात नसतानाही अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बारी समाज मोठ्या प्रमाणात या तिन्ही औषधी वनस्पतींचे उत्पादन मागील ५ दशकांपासून घेत आहे.

या औषधी वनस्पतींना राजाश्रय मिळवण्यासाठी पान पिंपरीपासून पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी उत्पादकांकडून केली जात आहे. या औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतल्यानंतर त्याला निश्चित हमीभाव मिळत नाही. मुसळी, पानपिंपरी व पान वेलींना २०१७ पर्यंत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे औषधीय वनस्पती योजनेंतर्गत अनुदान दिले जात होते. परंतु, नंतर ते बंद करण्यात आल्याने उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी न डगमगता उत्पादक कंपन्यांची स्थापना करून त्याद्वारे संग्रहण, विपणन, गोदाम व इतर साहित्याची जुळवाजुळव केल्यामुळे सध्या काही प्रमाणात का होईना, या औषधी वनस्पतींचे उत्पादन जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात तग धरून आहे.

राज्यात केवळ अमरावती जिल्ह्यातच पान पिंपरी व मुसळीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या तुलनेत मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये या औषधी वनस्पतींचे कितीतरी अधिक पटीने उत्पादन घेतले जाते. कारण, तेथे या औषधी वनस्पतींना राजाश्रय मिळाला आहे. अनुदान, संरक्षण मिळत आहे. तसेच अनुदान व संरक्षण राज्य व केंद्र शासनाने अमरावती जिल्ह्यातील या औषधी वनस्पतींना दिले तर येथेही मोठ्या प्रमाणात उत्पादन तर घेतले जाईलच सोबतच रोजगारही मिळेल. कारण, या औषधी वनस्पतींना बाजारात चांगली मागणी आहे.

पानपिंपरी ही कफजन्य आजार, खोकला यासाठी उपयोगी असून मुसळी हे शक्तिवर्धक औषध आहे. त्याचा वापर च्यवनप्राशसह इतर औषधांमध्ये केला जातो. तसेच विड्याच्या पानाचे सेवन नियमितपणे केल्यास पाचन शक्ती सुधारते. लागवड व तोडणी करण्यासाठी मजूरही तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने यासाठी कार्यशाळेचे आयोजन करावे, असे मत उत्पादकांनी व्यक्त केले आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here