कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने यावर्षी सुद्धा शुक्रवारी बारावी परीक्षेत यश मिळवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला.
.
शहरातील रोहिणी लवाळे ९७.१७ टक्के, खुशी भंसाली ९३. टक्के, अखिलेश चिकटे ७६ टक्के, वेदिका मगर ७३ टक्के आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले आर्मीचे जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन गजानन धरमकर यांनी केले तर प्रास्ताविक कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले. डॉ. अशोक ओळबे, माजी नगरसेविका मंगला म्हैसने यांच्यासह प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार विठ्ठल चिकटे यांनी मानले. कार्यक्रमाला वसंता माळी, हिंमतराव पोहरे, माजी सैनिक लक्ष्मण मोरे, चंद्रकांत ताठे, भिकाजी भगत, प्रल्हाद शेळके, वसंत जायदे, भागवत गिरी आदी उपस्थित होते.