Amabati Raydu Trolled For contrtovesial Tweet India Pakistan War Tajya Batmya | भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत; नेटिझन्सने शिकवला धडा

0

[ad_1]

Ambati Raydu Controversial Tweet: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानी सैन्य संतप्त झाले आणि त्यांनी भारताच्या सीमावर्ती भागात हल्ला केला. अशाप्रकारे सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान असं युद्ध सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती आणि सीमेवरील प्रचंड तणावामुळे देश एक झाला आहे. या संदर्भात, भारतीय क्रिकेटपटूंनी भारतीय सैन्याच्या धाडसाचे आणि ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे. पण अंबाती रायुडूने एक अशी कमेंट केली ज्यामुळे लोकांचा रोष वाढला. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू सोशल मीडियावर ट्रोल झाला.

रायुडूला कशासाठी ट्रोल  केले जात आहे?

आयपीएल 2025 (IPL 2025)  दरम्यान, अंबाती रायुडूने एक्सवर शांततेचे आवाहन केले. त्याने महात्मा गांधींचे एक वाक्य शेअर केले. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘डोळ्यासाठी डोळा घेतल्याने संपूर्ण जग आंधळे होईल.’ (“An eye for an eye makes the world blind..”) भारत-पाकिस्तान याच सुरु असलेल्या वादात अंबाती रायुडूने हे वाक्य शेअर केले आहे. यानंतर लोकांनी सोशल मीडियावर रायुडूला खूप ट्रोल केले जात आहे. भारताने जाणूनबुजून काहीही केले नाही असे म्हणत रायुडूला ट्रोल केले जातात. सगळ्यात आधी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारले. त्यानंतरच हे सगळे घडत आहे, असे नेटिझन्स म्हणत आहे. 

 

शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना- रायुडूची पोस्ट 

यानंतर रायुडूने एक पोस्ट पोस्ट केली की, “जम्मू-काश्मीर, पंजाब आणि सीमेजवळील भारतातील इतर भागांमध्ये शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. सर्वांसाठी शक्ती, सुरक्षितता आणि जलद निराकरणाची आशा आहे.  जय हिंद.” अलीकडच्या काळात रायुडू अनेकदा वादात सापडला आहे. त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळ्या संघांचे चाहते संतप्त झाले आहेत. 

हे ही वाचा: LSG vs RCB: आज IPL चा सामना होणार की नाही? अरुण धुमाळ यांनी चाहत्यांना दिली माहिती

 

नेटिझन्सने शिकवला धडा 

हे ही वाचा: रोहितची ‘ती’ घोषणा अन् हिटमॅनच्या चाहतीला अश्रू अनावर, ढसाढसा रडतानाचा Video Viral

​रायडूने केले स्पष्ट

ट्रोल झाल्यानंतर अंबाती रायुडूने स्पष्टीकरण दिले आणि लिहिले,  ‘डोळ्यासाठी डोळा घेतल्याने संपूर्ण जग आंधळे होईल.  आपण लक्षात ठेवूया – हे कमकुवतपणाचे आवाहन नाही तर विवेकाची आठवण करून देणारे आहे. , न्याय दृढ राहिला पाहिजे, परंतु मानवतेला कधीही विसरू नये. आपण आपल्या देशावर मनापासून प्रेम करू शकतो आणि तरीही आपल्या हृदयात करुणा ठेवू शकतो. देशभक्ती आणि शांती एकत्र राहू शकतात.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here