[ad_1]
India Pakistan War: पाकिस्तानशी सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट पाहत आहोत, असे इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी गुरुवारी सांगितले. आता प्रश्न पडतो की शुक्रवारी, 9 मे रोजी होणारा सामना होणार की नाही याबद्दल प्रश्न पडला आहे. पण सध्या तरी, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामना शुक्रवारी वेळापत्रकानुसार खेळवला जाईल असे सांगण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्यावरच रद्द करण्यात आला.
काय म्हणले अध्यक्ष अरुण धुमाळ?
बीसीसीआयचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले की, ‘आम्ही सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. सरकारकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. सर्व लॉजिस्टिक बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल.’ त्यांनी हेही स्पष्ट केले की, ‘लखनऊमध्ये शुक्रवारचा सामना निश्चितपणे होईल, परंतु परिस्थिती बदलत असल्याने सगळ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.’
धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द
गुरुवारी, 8 मे 2025 रोजी धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरू असताना अचानक फ्लडलाइट्स बंद पडल्या. यामुळे खेळ थांबवावा लागला आणि सुरक्षा कारणास्तव प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले. दर्शकांमध्ये ‘बॉम्ब येत आहेत’ अशा घोषणा ऐकू आल्याने घबराट निर्माण झाली. सुरक्षा कारणांमुळे सामना रद्द करण्यात आला.
धर्मशाळेतील खेळाडूंना कुठे नेण्यात आले?
धर्मशाळेतील सामना रद्द झाल्यानंतर, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना आणि सहायक कर्मचार्यांना पठाणकोट येथे विशेष ट्रेनद्वारे दिल्लीला नेण्यात आले. पठाणकोट धर्मशाळेपासून सुमारे 85 किलोमीटर दूर आहे, आणि तिथून दिल्लीला जाण्यासाठी ते रस्ते मार्गाने प्रवास करतील.
सध्याच्या परिस्थितीत, लखनऊमध्ये शुक्रवारचा सामना नक्कीच होणार असल्याची माहिती आहे, परंतु भविष्यातील सामन्यांबाबत निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल.
[ad_2]