[ad_1]
Devmanus and Anna Naik : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ या मालिकेचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून सगळ्यांना या चित्रपटाला घेऊन उत्सुकता होती की कधी ही मालिका सुरु होणार. आता अखेरीस ‘झी मराठी’वर ही मालिका कधी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तारिख समोर आली आहे.
‘देवमाणूस’ ही मालिका येत्या 2 जूनपासून रात्री 10 वाजता झी मराठी’वर पाहता येणार आहे. या आधी या मालिकेचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत किरण गायकवाडसोबत आणखी एक अप्रतिम अभिनेता दिसणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल का हा कोण तर हा अभिनेता दुसरा कोणी नसून माधव अभ्यंकर आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करणारे अण्णा नाईक हे आता ‘देवमाणूस’ च्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता प्रेक्षकांचे दोन आवडते खलनायक म्हणजे अण्णा नाईक आणि देवमाणूस एकत्र दिसणार आहेत.
या मालिकेत पहिल्या दोन सिझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्रं पाहायला मिळणार आहेत. तर किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर या दोघांसोबत मालिकेत अभिनेत्री सोनम म्हसवेकर आणि सरु आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार दिसणार आहेत.
हेही वाचा : रिलेशनशिपमधील Soft Launch आणि Hard Launch चा अर्थ काय? Gen Z मधील ट्रेंडबद्दल जाणून घ्या
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मालिकेच्या प्रोमोनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. प्रोमोमध्ये देवीसिंगचं कुटुंब दाखवण्यात आलं आहे. आई, वडील, बायको, मुलगी आणि आजी अशी त्याची संपूर्ण फॅमिली पहिल्यांदाच समोर आली. या घरात त्याचं महिलांचे कपडे शिवण्याचं काम कोणीच मान्य करत नाही. त्यातही त्याची बायको त्याच्यावर चिडून जेवणाचं ताट त्याच्यासमोर आपटते. आजी घरातून हकलवण्यास सांगते. वडील म्हणतात, ‘बाहेर बायकांचे झंपर शिवून माझी इज्जत घालवलीसच, आता घरातही तेच चालू आहे.’ त्यानंतर चिडून तो न जेवता तिथून निघून जातो.
[ad_2]