महाराष्ट्रात आता स्थानिक संस्थानच्या निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. त्यानुसार सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच जिल्ह्यासाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. महायु
.
परभणीत शिवसेनेने जिल्हाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने मावळते जिल्हाध्यक्ष व इतर शिवसैनिकांनी याचा विरोध केला आहे. शिवसेनेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड म्हणजे शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे, असे व्यंकट शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच आपण पक्षनेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आनंद भरोसे यांची नवीन जिल्हाध्यक्ष पदावर केली आहे. यावर मावळते जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे यांनी तीव्र विरोध केला आहे.
आनंद भरोसे हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयात करण्यात आलेले उमेदवार होते. तसेच दोन दिवसापूर्वीच त्यांचे सख्ख्या भावाला भाजपने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तर आनंद भरोसे यांची शिवसेनेने जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. परभणी येथील एकाही पदाधिकाऱ्याला हे मान्य नसल्याचे व्यंकट शिंदे यांनी म्हटले आहे. व्यंकट शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इथली शिवसेना ही भाजपच्या दावणीला बांधण्यासाठी हा निर्णय झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्व पदाधिकारी मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींकडे आपले म्हणणे मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्यात येणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे म्हटले होते. मात्र, महायुतीमधील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.