Imtiaz Jaleel on Government criticized for water shortage in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या पाणीटंचाईवरून सरकारवर टीका: सत्तेमध्ये असताना लोकांना तहानलेले ठेवले, इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल – Chhatrapati Sambhajinagar News

0

[ad_1]

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगर येथील पाणी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी सरकारवर टीकाही केली आहे. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

.

इम्तियाज जलील म्हणाले, सत्तेमध्ये असताना लोकांना तहानलेले ठेवले. आजकाल जे आदित्य ठाकरे करत आहेत, तेच काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस करत होते. त्यांनी हंडा मोर्चा काढला होता. त्यांचे सरकार एवढ्या वर्षांपासूनची होती त्यांना पाणी पाजायचे असते तर पाणी पाजू शकले असते. पण भाजप आणि शिवसेना यांची जेव्हा महानगरपालिकेमध्ये युती सरकार होती तेव्हा औरंगाबादच्या पाण्याचा ठेका भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे आमदार मालक सुभाष चंद्र गोयल यांची कंपनी समांतरला देण्याचं निर्णय घेतला होता.

इम्तियाज जलील म्हणाले, पाण्याचा ठेका एका प्रायव्हेट कंपनीला देण्याचा निर्णय तेव्हा घेण्यात आला होता. शहरांमध्ये पाण्याची समस्या झालीच कस काय दहा बारा दिवस पाणी येत नाही. याच्या मागचे कारण माझे यामध्ये त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट होते. हे काय रॉकेट सायन्स नाहीये हे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे दोघांनाही माहित आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, जेव्हा पाण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता तेव्हा मंत्र्यांनी अनेक दिवस असेही केले नव्हते हवा तेवढा पैसा त्यातून कमिशन म्हणून मिळत नव्हता. एकीकडे जनता तहानलेली असताना तुम्हाला पाण्यातूनही पैसा काढायचा होता. 50 किलोमीटरची लाईन आहे, जायकवाडी धरणापासून येईपर्यंत आणायचे आहे त्याचा कॉस्ट एसकलेशन जर आपण पाहिले दर दोन महिन्यानंतर दहा टक्क्यांनी वाढत होते.

इम्तियाज जलील म्हणाले, मोठे मोठे मंत्री औरंगाबाद मधले ठेकेदार हे सगळे तिहार जेलमध्ये जाऊ शकतात एवढा पैशांची लूट त्यांनी केली आहे. आता आदित्य ठाकरे येत आहेत यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा त्यांनी मोठे मोठे हांडे महिलांना दिले होते आणि त्या महिला त्या हांडे घेऊन देवेंद्र फडणवीस येत होत्या तेव्हा हांडे घेऊन नाचत होते. म्हणजे जसं काही देवेंद्र फडणवीस पाणी घेऊनच येत आहेत.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here