Pune Koyta Gang Video Update Attack On Boy Dattawadi Cctv Video Viral | Pune Crime News | पुण्यात कोयता गँगचा अक्षरशः हैदोस: तरुणावर ​​​​​​​भररस्त्यात प्राणघातक हल्ला; प्राण वाचवण्यासाठी पळणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल – Pune News

0

[ad_1]

पुण्यात कोयता गँगने अक्षरशः हैदोस मांडला आहे. या गँगने शहरातील दत्तवाडी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्यात हा तरुण स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसून येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

.

गत काही वर्षांत पुण्यातील गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. येथील कोयता गँग भररस्त्यात अनेकांवर हल्ले करून पोलिसांना आव्हान देत आहे. त्यानंतरही पोलिस यंत्रणेला या गुंडांवर कडक कारवाई करण्यात अपयश येत असल्याची ओरड होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील दत्तवाडी परिसरात कोयता गँगने भररस्त्यात एका तरुणावर हल्ला चढवल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांपैकी एकजण ‘अरे पकड त्याला, सोडू नको’, असे म्हणताना दिसून येत आहे.

दत्तवाडी परिसरातील रस्त्यावर भरदिवसा थरार

यासंबंधीच्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरात घडली आहे. त्यात 7 ते 8 जणांचे एक टोळके एका तरुणाच्या मागे हातात कोयता व इतर धारदार शस्त्रे घेऊन पाठलाग करताना दिसून येत आहेत. या गुंडांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर तरुण जिवाच्या आकांताने रस्त्यावर धावत जातो. एका ठिकाणी तो गुंडांना हुलकावणी देत एका गल्लीत शिरण्याचा प्रयत्न करतो. पण रस्त्यात उभ्या असलेल्या कारला धडकून तो खाली पडतो. हल्लेखोर त्या ठिकाणी त्याला गाठत त्याच्यावर शस्त्रांनी सपासप वार करतात. हा सर्व प्रकार तेथील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

घटनास्थळी अनेकजण हजर, पण कुणाचीही मदत नाही

हा प्रकार सुरू असताना एका स्कुटीवर बसलेला तरुण जखमी तरुणाला आणखी मारहाण करण्याची सूचना देतानाही दिसून येत आहे. घटनास्थळी इतर 5-6 जणही दिसून येत आहेत. पण त्यापैकी कुणीही जखमी तरुणाला हल्लेखोरांपासून वाचवण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाहीत. यावरही मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्या अंगावर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टर त्याचे प्राण वाचवण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

खाली पाहा घटनेचा व्हिडिओ

हे ही वाचा…

अजित पवार हे शरद पवारांच्या पक्षाला सोबत घ्यायला तयार नाहीत:संजय राऊतांचा खोचक टोला; अमित शहा राजकारण सोडणार असल्याचा दावा

मुंबई – अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खोचक टोला लगावला आहे. या संबंधी ते म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मोदी – शहा गेल्यानंतर यांच्याकडे काहीही राहत नाही. त्यामुळे हे दिवस निघून जातील, असा सल्ला देखील त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना दिला आहे. वाचा सविस्तर

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here