[ad_1]
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पात बिबट्या आढळला आहे. प्रकल्पाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ बिबट्याचे ठसे सापडले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे स्पष्ट दर्शन झाले आहे. वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असू
.
बुधवारी सायंकाळी कामगारांना रस्त्यावर जनावरांच्या पावलांचे ठसे दिसले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तपासणीत हे ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या प्रकल्पात फिरताना दिसून आला.
गुरुवारी दुपारनंतर वनविभागाच्या विशेष टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. वनविभागाचे कर्मचारी अमोल गावनेर यांनी परिसरात बिबट्या असल्याची पुष्टी केली आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सुमारे १३५० एकर क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात बिबट्याला शोधणे वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. सकाळपासून सुरक्षा कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्ष देखरेख करत आहेत. कामगारांनी स्थानिक प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
[ad_2]