Zilla Parishad pays Rs 10,571 per day for cleanliness, private agency gets annual contract of Rs 25,79,362 | भुर्दंड: जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेसाठी‎रोज मोजावे लागतात 10,571‎, खासगी यंत्रणेला 25,79,362 रुपयांचे वार्षिक कंत्राट‎ – Amravati News

0

[ad_1]

अमरावती जिल्हा परिषदेत नियमित परिचर नाही. नोकर भरतीची मुभा नसल्यामुळे त्यांची भरतीही करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने २५ लाख ७९ हजार ३६२ रुपयांचा वार्षिक कंत्राट दिला आहे. या कंत्राटानुसार मुख्यालयाच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद प्रशास

.

सण-उत्सव, शनिवार-रविवार आणि सुटीचे दिवस वगळल्यास इतर शासकीय कार्यालयांप्रमाणेच वर्षभरात जिल्हा परिषदेचे कार्यालयसुद्धा २४४ दिवसच सुरू राहणार आहे. एवढ्या दिवसांसाठी जि. प. प्रशासनाला सुमारे २६ लाख रुपये मोजावे लागणार आहे. जि. प.चे वेगवेगळे विभाग आणि स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी जि. प. प्रशासनाने ३० लाख ५२ हजार ५०० रुपयांची निविदा प्रकाशित केली होती. त्यानुसार पाच जणांनी ही निविदा सादर केली.

जि. प. प्रशासनाने बचत कशी होईल याकडे लक्ष द्यावे किमान वेतनाच्या नियमानुसार परिचर नेमले तरी एवढ्या रकमेत किमान ८ परिचरांचे वेतन दिले जाऊ शकते. मुळात एवढ्या परिचरांची गरजही नाही. त्यामुळे स्वउत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नसलेल्या जिल्हा परिषदेने आर्थिक भुर्दंड वाढवण्याऐवजी बचत कशी साध्य होईल, याकडे लक्ष द्यावे, असे मत जि. प.च्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पात्रतेच्या निकषात न बसल्याने दोन निविदा रद्द नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने पात्रतेच्या निकषांवर दोन निविदा रद्द केल्या. उर्वरित तीन निविदांपैकी सर्वात कमी रकमेची (एल-वन) एक निविदा स्वीकारली. ही निविदा सुशिक्षित बेरोजगार संवर्गातील आहे. गेल्यावर्षी बांधकाम विभागामार्फत असा कंत्राट दिला होता. तो संपल्याने यंदा नव्याने प्रक्रिया राबवली. त्यानुसार ३२०० रुपये निविदेची किंमत आणि ३१ हजार रुपये बयाना रक्कम निश्चित केली होती. सीइओ, कॅफो, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपमुख्याधिकारी अशा चार अधिकाऱ्यांच्या सहीने ही निविदा जारी केली होती. दरम्यान दरवर्षी हा भुर्दंड सहन करण्याऐवजी कंत्राटी परिचरांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत स्वच्छता करून घेणे सुकर होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निविदा दाखल करणारी यंत्रणा रक्कम सचिन देशमुख, अमरावती २७ लाख ५० हजार नरेश निशांत लकडे, अमरावती २६ लाख २६हजार ८३५ निकिता सचिन पाल (सु.बे.), अमरावती २५ लाख ७९ हजार ३६२ डोंगरे बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन, नागपूर निविदा रद्द व्हीकेएन एंटरप्रायजेस, चंद्रपूर निविदा रद्द अपसेट प्राइसच्या तुलनेत ४.५० लाखाने कमी कंत्राट वर्षभरातील सुटीचे दिवस आणि कंत्राटाची एकूण रक्कम (अपसेट प्राईस) लक्षात घेता जि. प.ला दररोज १२ हजार ५१० रुपये साफसफाईवर खर्च करावे लागणार होते. परंतु या रकमेपेक्षा कमी किमतीत कंत्राट दिला गेल्याने एकूण खर्चात सुमारे साडेचार लाख रुपयांची बचत झाली आहे. नियमित परिचर असते तर ही बचत आणखी जास्त होऊ शकली असती, असे काहींचे निरीक्षण आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here