[ad_1]
शासनाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील येथे मोर्चा काढण्यात आला.
.
माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, किसान सभा तालुकाध्यक्ष देविदास वाघ, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या आवारातून मोर्चास प्रारंभ करत थेट तहसील कार्यालयात मोर्चा आला. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चामुळे निळवंडी रोडवर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातूून निघालेल्या या मोर्चामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, कारखान्यातील रोजगारात स्थानिक युवक, युवतींना ८० टक्के प्राधान्य द्यावे, ऑनलाइन रेशनकार्ड करत लाभार्थ्यांना शिधा वाटप करा, वृद्धापकाळ, विधवा महिला पेन्शन चालू करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, हेग्जोगोन न्यूट्रिशियन कंपनीच्या कामगारांना पूर्वत कामावर घ्या, सफाई कामगारांना किमान वेतन लागू करा या मागण्यांचा समावेश आहे.
[ad_2]