Unique protest by rowing a boat through the stagnant water on a road in Pune | पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बोट चालवून अनोखे आंदोलन: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचा मनपाला धडा – Pune News

0

[ad_1]

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून जाेरदार पाऊस सुरु असून त्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे. रस्त्यावर पडणारे खड्डे आणि साठलेले पाणी यामुळे त्रास सहन कराव्या लागलेल्या पुणेकराने यावर नामी उत्तर शाेधले आहे. मांजरी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श

.

याबाबत गजेंद्र माेरे म्हणाले, पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएमआरडीएच्या निषेधार्थ हे आंदाेलन करण्यात येत आहे. मांजरी येथील रस्त्यावर पाउस पडल्यावर पाणी साचले परंतु त्याकडे प्रशासनाने तात्काळ उपाययाेजना करण्याचे ऐवजी दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना देखील कसरत करावी लागत असल्याने अपघात हाेण्याचा धाेका आहे. मनपा सातत्याने सांगते की, आम्ही पावसळयापूर्वीच्या उपाययाेजना केल्या आहे परंतु त्या कशा कुचकामी आहे हे यातून दिसून येत आहे. नालेसफाईची कामे वेळेत मार्गी लावणे, रस्ते दुरुस्ती करणे, खड्डे बुजवणे, ड्रेनेज साफसफाई करणे, धाेकादायक ठिकाणी उपाययाेजना करणे आदी कामाकडे मनपा कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट हाेत आहे. मान्सूनपूर्व अवकाळी पावसळयातच ही स्थिती असेल तर मान्सून मध्ये शहराची आणखी दयनीय अवस्था हाेईल.

दरम्यान, माेरे यांनी केलेले आंदाेलन पाहण्यासाठी नागरिकांनी देखील जाता-येता वाहने रस्त्यावर थांबून गर्दी केली. अनेकजण रस्त्यावरील बाेटीचे फाेटाे काढून ते साेशल मिडियावर व्हायरल करताना दिसून आले आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here