[ad_1]
शत्रूराष्ट्राला सांगून त्याच्यावर हल्ला करणे हे देशप्रेमाचे लक्षण आहे का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला आहे. केंद्राने पाकला कळवून अतिरेकी अड्ड्यांवर कारवाई केली. आम्ही तिकडे
.
काँग्रेसने बुधवारी सद्भावना दिनानिमित्त चंद्रपूर येथे तिरंगा रॅली काढली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त प्रश्न उपस्थित केला. तसेच पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेले 250 किलो आरडीएक्स कुठून आले याचा शोध अद्याप लागला नसल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, लोकशाही जनतेला व विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी प्रश्न विचारताच सरकार ते सैन्याचा अपमान असल्याचा आरोप करते. या देशात भाजपला सैन्याचा अभिमान केव्हापासून वाटू लागला आहे?
पुलवामावेळी 250 किलो RDX कुठून आले?
पुलवामा हल्ल्यावेळी 250 किलो आरडीएक्स कुठून आले? ते कुणी आणले? आणणारे कोण होते? याचा शोध अद्यापही लागला नाही. पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणारे 4 अतिरेकीही अजून सापडले नाहीत. आपण सीमापार लढाई केली, पण भारतात लपलेल्या या अतिरेक्यांचा शोध लागला नाही. आम्ही याविषयी प्रश्न केला केला तर आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. आमच्यावर सैन्यदलांचा अवमान केल्याचा आरोप केला जातो. पण या देशात तिरंग्याचा सर्वाधिक अवमान करणारे कोण आहेत? हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे आम्ही आजच्या तिरंगा रॅलीद्वारे सैनिकांच्या शौर्याला सलाम केला.
हे देशप्रेमाचे लक्षण आहे का?
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केंद्राने पाकला कळवून त्याच्यावर हल्ला केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, सरकारने पाकला कळवून अतिरेकी अड्ड्यांवर कारवाई केली. आम्ही तिकडे कारवाई करणार आहोत, त्यामुळे तेथून तुमचे अतिरेकी व सैन्य हलवा, मग आम्ही रिकाम्या जागेवर हल्ला करतो असा याचा अर्थ होतो. हाच प्रश्न आमच्या पक्षाने सरकारला विचारला. त्यात काहीच चूक नाही. एखाद्या देशाला असे सांगून हल्ला करणे योग्य आहे का? हे देशप्रेमाचे लक्षण आहे का? या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
एकाही देशाने भारताला मदत केली नाही
ते पुढे म्हणाले, केंद्रात मागील 10 वर्षांपासून मोदी सरकार आहे. पण पाकविरोधात युद्ध सुरू झाले तेव्हा एकाही देशाने आपल्याला मदत किंवा पाठिंबा दिला नव्हता. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आपल्या शेजारी देशांनीही आपल्याला मदत करण्याची तयारी दर्शवली नाही. ज्या देशांना आपण मदत केली, त्या देशही आपल्यासोबत उभे टाकले नाही. या स्थितीत विविध देशांत शिष्टमंडळ पाठवून सरकार सर्वांसोबत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. देर आये दुरुस्त आये असा हा प्रकार आहे. त्यातून काय फायदा होईल हे काळच ठरवेल. पण आपले परराष्ट्र धोरण चांगले नव्हते, आपले कुणाशी संबंध चांगले नव्हते, हे ऑपरेशन सिंदूरनंतर प्रकर्षाने दिसून आले.
युद्धात आपले किती नुकसान झाले?
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भारत-पाकमध्ये झालेल्या शस्त्रसंधीवरुनही केंद्रावर निशाणा साधला. भारताने अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर शस्त्रसंधी केली. त्यानंतर पाकने आपला सैनिक परत केला. आपणही त्यांचा सैनिक परत पाठवला. लोकशाहीत सरकारला आपले किती नुकसान झाले? आपले किती जवान मारले गेले किंवा जखमी झाले? किती राफेल विमानांचे नुकसान झाले? असे प्रश्न करण्यात काय चुकीचे आहे.
पाकचे 15 हजाराचे ड्रोन 15 लाखांच्या क्षेपणास्त्राने पाडले
पाकने भारतावर चिनी बनावटीच्या 5 हजार ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यांच्या एका ड्रोनची किंमत 15 हजारांच्या आसपास आहे. हे एक ड्रोन पाडण्यासाठी आपण 15 लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. आत्ता यामागे चीनचे डावपेच असल्याचा दावा केला जात आहे. मला वस्तुस्थिती माहिती नाही. पाकने आपली 4 राफेल विमाने पडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी स्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे. युद्धानंतर स्थिती स्पष्ट करण्यात काही कमीपणा किंवा चुकीचे आहे असे मला वाटत नाही. युद्धात शस्त्रसंधी झाल्यानंतर रॅली काढून ते जिंकल्याचे सांगितले जात आहे. असा प्रकार पहिल्यांदाच देशात होत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा…
[ad_2]