Eknath Shinde’s blow To BJP Amravati | Jagdish Gupta Shiv Sena Entry Update | एकनाथ शिंदे यांचा भाजपला झटका: अमरावतीचा बडा नेता शिवसेनेच्या गळाला, माजी मंत्री जगदीश गुप्ता शिंदेंच्या गोटात जाण्याची चर्चा – Amravati News

0

[ad_1]

अमरावतीचे भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत. गुप्ता यांचे अमरावतीत मोठे वजन आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

.

सुप्रीम कोर्टाने नुकतेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला 4 महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार या निवडणुकांची अधिसूचना कोणत्याही वेळी जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आयाराम-गयारामांची संख्या लक्षणीयपणे वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती येथील भाजप नेते तथा माजी मंत्री जगदीश गुप्ता हे सत्ताधारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जगदीश गुप्ता यांचे स्थानिक राजकारणात वजन

यासंबंधीच्या माहितीनुसार, जगदीश गुप्ता यांचा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. जगदीश गुप्ता यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय ते एकदा विधान परिषदेचेही सदस्य राहिलेत. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. बंडखोरीमु्ळे भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

पण स्थानिक राजकारणात जगदीश गुप्ता यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ते निर्णायक भूमिका बजावतील असा दावा केला जात आहे. विशेषतः त्यांच्या प्रवेशामुळे अमरावतीत भाजपला नुकसान होऊन शिवसेनेला सुगीचे दिवस येतील असाही दावा केला जात आहे.

चंद्रपुरात काँग्रेस, शरद पवार गटाला झटका

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे या दोन्ही पक्षांना जबर झटका बसला आहे. प्रवेश करणाऱ्यांत 5 नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपचे बळ वाढल्याचे चित्र आहे. राजुरा मतदारसंघात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. पण काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे. पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामु्ळे त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्याचा फायदा भाजपने उचलल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा…

वैष्णवीच्या दीराने चक्क बैलापुढे नाचवली होती गौतमी:हगवणे सुनेचा छळ करून पैसे मागायचे आणि उधळपट्टी करायचे, पाहा VIDEO

पुणे – वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हगवणे कुटुंबीयांचे अनेक कारनामे आता उजेडात येत आहेत. वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याने 2 वर्षांपूर्वी आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. वाचा सविस्तर

भुजबळांना मिळाला सातपुडा बंगला:धनंजय मुंडेंना 15 दिवसांत बंगला खाली करण्याचे आदेश; वाचा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला?

मुंबई – राज्याचे नूतन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्यात आला आहे. हा बंगला सध्या राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असून, त्यांना हा बंगला खाली करण्यासाठी सरकारने 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर या बंगल्यात भुजबळांचा गृहप्रवेश होईल. वाचा सविस्तर

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here