गावोगावी धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजेत : आगाणेकाका
सातारा : धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी गावोगावी समता सैनिक,बौद्धाचार्य व धम्म प्रचारक अधिकाधिक संख्येनी निर्माण झाले पाहिजेत.असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव नाथा ममता आगाणे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा,शाखा – पाटण तालुका यांच्यावतीने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे माजी राष्ट्रीय सचिव एन.एम.आगाणे (काका) यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा काका मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष आनंदा भंडारे होते.यावेळी महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,कराड तालुकाध्यक्ष आप्पा अडसुळे (बहुले) यांची विशेष अशी उपस्थिती होती.
केंद्रीय शिक्षक उत्तम पवार, बंधुत्व धम्मरत्न पुरस्कार विजेते केंद्रीय शिक्षक रुपेश सावंत दगडू तांदळे, संस्कार विभाग जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद कांबळे, पर्यटन विभाग माजी उपाध्यक्ष आबासाहेब भोळे,रिपब्लिकन सेनाध्यक्ष सचिन कांबळे,वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, मोरणा विभाग अध्यक्ष हणमंत कांबळे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,सचिव क्रांती बोलके, चाफळ विभागाध्यक्ष रवींद्र काकडे, महिला विभागध्यक्षा कमलताई कांबळे,जिल्हा माजी सरचिटणीस उदय भंडारे,कैलास चव्हाण आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी आगाणे काका यांच्यासह घोडके (महिंद),मिलिंद कांबळे बापू (दाम्पत्य),नथु रोकडे,अरविंद कांबळे,मधुकर जगधनी (अण्णा),विजय भंडारे, बाळासाहेब जगताप (वंचित जिल्हा उपाध्यक्ष),सुगंधराव देवकांत,सुनील कांबळे (आबा), सुदाम रोकडे व मंगल परिणय दिन रेश्मा उमेश गायकवाड (दाम्पत्य) आदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याशिवाय,नवनिर्वाचित बौद्धचार्य हणमंत कांबळे,नंदकुमार भोळे व विनोद कांबळे यांचेही अभिनंदन करण्यात आले.
घनश्याम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.सदरच्या सभेस वंचितचे कराड युवा तालुकाध्यक्ष विक्रम होवाळ,शाहू फुले विद्ववत सभेचे सुनील जाधव, ऍड.राहुल भोळे,नितीन भोळे, जगन्नाथ सावंत,मधुकर गायकवाड, तालुक्यातील पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी विहारात उपस्थित होते. सरतेशेवटी आगाणे काकांच्या निवासस्थानी मिष्टान्न भोजनांनी सांगता करण्यात आली.