अलिबाग प्रतिनिधी,
नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी परीक्षेच्या निकालात सीबीएससी बोर्डच्या रिलायन्स फाउंडेशन इंग्लिश मिडीयम स्कूल लोधीवली रायगड येथील कु.वीर दिपाली रवींद्र कुंभार याने ९१.०४% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन रायगड अलिबाग तर्फे त्याचा त्याच्या राहत्या घरी जावून मेडल तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्याचे वडील रवींद्र शकुंतला लक्ष्मण कुंभार तसेच आई दिपाली रविंद्र कुंभार यांचा देखील भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जीवीता सुरज पाटील, अध्यक्षा भाग्यश्री सुशांत तांडेल, खजिनदार यश सूरज पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. मनात जिद्ध आणि प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीच अवघड नसल्याचे सांगत पुढे आयएएस अधिकारी होण्याच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे मत वीर याने व्यक्त केले.
वीर याचे वडील रवींद्र कुंभार हे तुपगावचे सरपंच तसेच डेव्हलपर असून आई दिपाली कुंभार ह्या जे.एम.म्हात्रे इंग्लिश मिडीयम स्कूल नढाळ येथे शिक्षिका असून त्या तेजस्विनी फाऊंडेशन विश्वस्त पदाधिकारी आहेत. वीर याच्या स्वप्नांना आणि वाटचालीला शुभेच्छा देत त्याचे तेजस्विनी फाउंडेशनने कौतुक केले. त्याच्या यशात त्याच्या मेहनतीसोबतच त्याचे आई, वडील, शिक्षक तसेच यमिता चौमाल आणि अथीरा मॅडम यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याचे यावेळी वीर याने सांगितले.