सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे विचार दिल्याने त्यांचे नातु धार्मिक, राजकीय,सामाजिक आदी क्षेत्रात भरीव असे काम करीत आहेत.तेव्हा कार्यकर्त्यांनी आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ रहावे. असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व साहस मतिमंद विद्यालयात विविध उपक्रमाने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. प्रथमतः डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तेव्हा अभिष्टचिंतनपर खंडाईत मार्गदर्शन करीत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ईंदूमिल येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर आहेत.त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. लाडू व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी सुनील बडेकर, बाबा आवाडे, विजय खरात,सुनील निकाळजे,गणेश कारंडे,संतोष मोरे,दादासाहेब केंगार,विशाल भोसले,योगेश कांबळे,बी.एल. माने, उत्तमराव पोळ,नंदकुमार काळे,अनिल वीर,अनिरुद्ध वीर आदी विविध क्षेत्रातील पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.जिल्हाध्यक्ष सुनील कदम यांनी पुतळा परिसरात व साहस विद्यालयात संजय कांबळे यांनी आभार मानले.