[ad_1]
महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेती कामांना चांगला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग खरिपाच्या पेरणीची जोरदार तयारी करत आहेत. काही ठिकाणी ठिबक सिंचनावर कपाशी लागवड सुरू झाली असून मका पेरणीम
.
कपाशीची लागवड ठिबक सिंचनाच्या आधारे सुरू झाली असून शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्यावर्षी भाव न मिळाल्याने यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याऐवजी मका पिकाचा पेरा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी कांतीलाल चौधरी म्हणाले, मे महिन्यात पाऊस चांगला झाला होता, पण सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरिपाची पूर्वतयारी सुरू केली आहे. यावेळी मका लावण्याचा विचार करत आहोत. कारण बाजारात मागणी चांगली आहे आणि जोखमीही कमी आहेत. कपाशीला कीड आणि उत्पादन खर्च अधिक असल्याने शेतकरी मागे हटत आहेत.दरम्यान, पावसाची उघडीप असल्याने केळीच्या बागांना पाणी द्यावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या शेतकरी शेती मशागतीची कामे करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कापसाला तोकडा भाव मिळत आहे. बियाणे, औषधे, रासायनिक खते महागली आहेत. मजूर वेळेवर मिळत नाहीत. वेचणीसाठी जादा दर द्यावा लागतो. त्यामुळे कापूस परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात. कापसावर मर, बोंडअळी, मुळकुजव्या, करपा, दहीया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर वेळेवर महागडी फवारणी करावी लागते. अन्यथा उत्पादन घटते. कापूस पीक मेहनतीचे आणि खर्चिक आहे. पूर्वी कापसाच्या भावावर सोन्याचे दर ठरत होते. दोन दशकांपूर्वी कापसाला अडीच हजार रुपये क्विंटल भाव होता. तेव्हा सोन्याचा दरही तसाच असायचा. आता सोन्याचा दर प्रतितोळा ९० हजारांच्या वर गेले आहे.
बियाणे, औषधे, खतांचा खर्च वाढला
[ad_2]