[ad_1]
मंत्री नीतेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याच्या कट कारस्थानातील एक भाग असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे. नीतेश राणे मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन वादग्रस्त विधान करतात.
.
प्यारे खान म्हणाले की, नीतेश राणे वारंवार देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन बोलतात. ते महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय मुस्लिम ईमानदार, तर पाकमध्ये गेलेले बेईमान आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन व्हावे असे आम्हालाही वाटते. पण बकऱ्यामु्ळे अनेकांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्याच्या बळीवर बंदी घातल्यास हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाजावर अन्याय होईल.
राज्यात ज्या दिवशी व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचा कायदा अस्तित्वात येईल, त्यादिवशी व्हर्च्युअल ईद साजरी केली जाईल. सध्या जो कायदा अस्तित्वात आहे, त्यानुसार ईद साजरी केली जात आहे. गो हत्या बंदी आहे, तो कायदा आहे. त्याचे पालन व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.
नीतेश राणेंवर निश्चितच कारवाई होईल
प्यारे खान पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस केवळ हिंदू समाजाचे मुख्यमंत्री नाहीत. ते सर्वांचे आहेत. ते सर्वांचे काम करतात. त्यामुळे नीतेश राणे यांनी त्यांच्यावर बोलण्यापूर्वी स्वतःची प्रतिमा तयार करावी. फडणवीसांना संपूर्ण जग ओळखते. तु्म्ही स्वतःचे वैयक्तिक मत मांडा. त्यात इतरांना समाविष्ट करू नका. नीतेश राणेंवर देवेंद्र फडणवीस यांचे संस्कार असते तर ते असे वागले नसते. काही चुकीचे होत असेल तर नीतेश राणेंवर निश्चितच कारवाई केली जाईल.
प्यारे खान यांनी यावेळी भाजप सरकारचे गुणगानही गायिले. भाजप सरकार ईमानदार आहे. त्यांच्या सरकारमध्ये चुकीचे काही चालत नाही. भाजपने चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आता नीतेश राणे यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. मी नीतेश यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे, असे ते म्हणाले.
आता पाहू काय म्हणाले होते नीतेश राणे?
नीतेश राणे यांनी सोमवारी मुस्लिम समाजाला बकरी ईद व्हर्च्युअल पद्धतीने साजरे करण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता. मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेत्यांनी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन करावे. असे झाले तर अनावश्यक समस्यांना आळा बसेल. विशेषतः हिंदूंना आपल्या समाजात निर्बंधांचा सामना करावा लागणार नाही, असे ते म्हणाले. विहित नियम आणि कायद्यांचे पालन न करता बकऱ्यांची कुर्बानी दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही राणे यांनी या प्रकरणी दिला होता.
हे ही वाचा…
ठाकरे बंधूंमधील वाढत्या प्रेमाची भाजपला चिंता:राज – उद्धव यांची एकत्र येण्याची इच्छा का? बावनकुळे राज ठाकरेंचा चहा केव्हा घेणार?
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य आघाडीमुळे भाजपच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच राज ठाकरे यांच्या घरी चहापाण्याला जाण्याची भाषा करत आहेत. वाचा सविस्तर
[ad_2]