[ad_1]
छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलावावरून पालकमंत्री संजय शिरसाट तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यात वाद सुरू आहे. संजय शिरसाट यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. परंतु अंबादास दानवे यांनी या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप के
.
सरकार अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही?
अंबादास दानवे म्हणाले, मी त्यांना आव्हान केले होते की तुमचे पाच पार्टनर कोण आहेत ते जाहीर करावे, आता मी सांगितले आहे की त्यांच्याच घरातले पार्टनर आहेत. सगळे काही तुमच्यासमोर आहे. मला सगळे माहीत आहे म्हणूनच मी बोलतो आहे आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली आहे. संजय शिरसाट यातला महत्त्वाचा मुद्दा नाही, तर शासकीय यंत्रणा विशेषतः महसूल विभागाची आणि तिथे ते एसडीएम राठोड यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. राज्य सरकार अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही करणार हा माझा प्रश्न आहे.
करंट वॅल्यूएशन काढले पाहिजे
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले आहे, पण सरकार काही हलायलाच तयार नाही. सरकार सांगते की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, तुमचेच मंत्री अशा पद्धतीने आणि अधिकारी पण भ्रष्टाचार करतात. आणि तुम्ही रोज याला नामांकन देता, त्याला नामांकन देता, काय नामांकन देता तुम्ही? तुमचा इथला अधिकारी महसूल विभागाचा सगळ्या अटी शर्थी बदलतो, साधे इन्कम टॅक्स तीन वर्षांचे विचारात नाही, ज्या मालमत्तेचा लिलाव करायचा त्याचे करंट वॅल्यूएशन काढले पाहिजे, ज्या दिवशी टेंडर निघाले त्या दिवशीचे वॅल्यूएशन काढले पाहिजे, हा वॅल्यूएशन कधीचे देतो 1989 चे, तेव्हा याच्या बापचे राज चालू आहे का महसूल अधिकाऱ्याच्या?
चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये
अंबादास दानवे म्हणाले, 2022 चे वॅल्यूएशन 160-170 कोटी आहे, तर 2025 चे वॅल्यूएशन काय येईल तुम्हीच बघा. आणि हा 45 आणि 65 मध्ये टेंडर काढतो अधिकारी. या अधिकाऱ्याला निलंबित करावे लागणार आहे सरकारला. एखादा महसूल विभागाचा एसडीएम आणि पालकमंत्री मिळून तिथे त्यांचा दबाव असल्याशिवाय त्यांचे काम करू शकत नाही. पण एखाद्या अधिकाऱ्याने दाबाखाली आले नाही पाहिजे. आणि शिरसाट काय बोलतात? मी चक्रम आहे, मी घर जाळून टाकेल तुमचे. मी राज्यपालांना आता पत्र पाठवत आहे थोड्याच वेळात. स्वतःच ज्यांनी कॅमेरासमोर कबूल केले आहे की मी चक्रम आहे तर अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये. चक्रमचा अर्थ मराठीत वेडा असा होतो, मग वेड्या लोकांना कशीकाय जागा आहे? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, बँकेच्या व्यवहारावर संजय शिरसाट यांनी बोलावे. त्यांचे रहस्य मला माहीत आहेत. नितेश राणेच काही दिवसांपूर्वी बोलले होते, मी तर अजून काही बोललो पण नाही. मागच्या काळातही त्यांच्या घरात एक प्रकरण घडले, मी त्यावर चकार शब्द बोललो नाही. त्याच्यात शेवटपर्यंत काय काय घडले हे मला सगळे माहीत आहे, पण मला त्या विषयात जायचे नाही. आणि मला काही देणे घेणे पण नाही. पण या हॉटेलच्या व्यवहारात महसूल विभाग, राज्य सरकार हे दोषी आहे. या महसूल अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, असे मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे.
नियमात कायद्यात राहून काम करावे
माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि मी ते मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हालाही पाठवतो थोड्यावेळाने. हे पहा कसे आहे त्यांनी फार मोठे व्हावे, त्यांनी 72 व्या मजल्यापर्यंत लावला आहे हात, आणखी वर जावे काही हरकत नाही, त्याविषयी काही नाही. त्यांना काही अजून लागले तर आम्ही मदत करू त्यांना पण नियमात कायद्यात करावे असे आमचे म्हणणे आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले.
अर्थ खात्याकडून निधीच दिला जात नाही
शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. यावर प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले, आता मांडीवर बसा म्हणा अजित दादांच्या भुजबळांच्या. कारण ज्या वेळेस उद्धवजींना सोडून गेले होते त्यावेळेस काय तुम्ही सांगितले होते. की अजित दादा निधी देत नाही म्हणून जातो. आता अजितदादा निधी देत नाही म्हणून तुमची बोंब आहे. शिक्षण मंत्र्यांकडे काही विषय घेऊन गेलो होतो, शिक्षकांना वेगवेगळ्या टप्प्यात पगार द्यायचा ठरला आहे. 20 टक्के दिलेला आहे, बाकी द्यायचे ठरले आहे. अजून दिले नाही, कारण निधीच दिलेला नाही. जल जीवन मिशन साठीचा निधी नाही दिलेला. सगळ्या योजना अधांतरी पडल्या आहेत.
[ad_2]