[ad_1]
महाराष्ट्र गौसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून या कालावधीत पशू बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मंत्री नीतेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आदित्य ठाकरेंनी
.
देशभरात 7 जून रोजी बकरी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गौसेवा आयोगाने पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सण तुम्ही साजरे करा, पण सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. मीही पर्यावरणप्रेमी आहे, पण कधी पाणी वाचवा, कधी रंग वाचवा, आता हे बचावण्याचे नियम इतके का वाढवायचे? सण साजरे करायला हवेत, पण श्वास घेण्याची मुभा देखील द्यावी, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यावरून नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.
नेमके काय म्हणाले नीतेश राणे?
आदित्य ठाकरे यांनी आपले आडनाव ठाकरे बदलून घेतले पाहिजे, त्यांनी आदित्य खान किंवा आदित्य शेख केले पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल. बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी बोचरी टीका नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर काय म्हणाले राणे?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बडगुजर भेटले असून प्रवेशाचा अधिकृत निर्णय झाल्याची काही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र, बडगुजरची ठाकरे गटातून हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकले आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू, अशी सावध प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.
राणेंकडून यापूर्वी बडगुजरांचे सलीम कुत्तासोबतचे फोटो शेअर
दरम्यान, नीतेश राणे यांनी यापूर्वी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचे फोटोही त्यांनी शेअर केले होते. त्यामुळे आता त्याच भाजपत बडगुजर जाणार असल्याने भाजप नेत्यांचीही गोची झाली आहे. त्यामुळे आता राणेंनी सावधपणे भूमिका मांडल्याचं दिसून येत आहे.
[ad_2]