देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगर नगरपरिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, दीनदयाल जन अजिविका योजना च्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगा दिनानिमित्ताने खास महिलांसाठी पाच दिवसाचे आनंद अनुभूती शिबिर आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले.
या शिबिरासाठी देवळाली प्रवरा शहरातील ९० महिला बचत गट सदस्या महिलांनी सहभाग नोंदवला होता. योगा सोबतच साधना सेवा, सत्संग याचा आनंद महिलांनी घेतला. वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून ज्ञान सूत्र समजावून सांगत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शिबिराची सांगता झाली. हे शिबिर समर्थ बाबुराव पाटील बहुउद्देशीय सभागृह या ठिकाणी योग प्रशिक्षक संदीप कोळसे व भारती कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिरात महिलांनी पूर्णवेळ हजेरी लावून आत्मनिर्भरतेचे योग संस्कार धडे गिरविले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहा. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी,समुदाय संघटक सविता हारदे, महिला आणि बालकल्याण विभागाच्या स्वाती आरोटे, तसेच वैष्णवी खरात, स्वाती गडाख, अनिता नन्नवरे, रूपाली तेलोरे, वनिता वाणी यांनी परिश्रम घेतले. बचत गटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी दिली.