सोनेवाडी प्रतिनिधी :
अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळा दिनांक 18 जून 2025 ते 7 जुलै 2025 आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर या ठिकाणी पाई वारीसाठी निघालेला असून या दिंडीमध्ये 300 च्या वर वारकरी नाशिक जिल्हा अहिल्यानगर जिल्हा व संभाजीनगर जिल्ह्यातून धामोरी संवत्सर भोजडे कान्हेगांव या ठिकाणी वारकरी सहभागी असून या दिंडी साठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री अहिल्यानगर यांच्या सहकार्याने डॉक्टर अभिजीत दिवटे यांनी दिंडीचे स्वागत करून भाविकांना चहा नाष्टा व आरोग्य तपासणी करून दिंडीचे सहकार्य केले व दिंडीत शुभेच्छा दिल्या दिंडी चालक हरिभक्त पारायण पांडू बाबा भाकरे तसेच हरिभक्त परायण मधुकर महाराज गडाख, श्री म्हसे, अशोकराव वावधने , बाळासाहेब दहे , दिलीपराव ढेपले, लक्ष्मणराव साबळे यांनी डॉक्टर अभिजीत दिवटे यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.