कोपरगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच झालेल्या ‘एम.एच सीईटी(MH- CET)’ सहभागी होऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यामध्ये चि. सार्थक आपासाहेब तुवर (९९.१५), चि.कुणाल अनिल खरात (९७.२९) कु. संचाली वैभव तोरपे (९६.३८)व कु. भाग्यश्री सुर्यकांत महाले (९१.९७) या गुणांसह चांगली श्रेणी प्राप्त केली आहे.
सदर विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र व शेती विषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनामार्फत घेतलेल्या एम.एच.- सी. ई. टी. परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यासाठी महाविद्यालयातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांना ९०.००%हून अधिक गुण मिळविले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी Integrated Course राबविले जातात.
या उपक्रमाचे फलित म्हणून आज महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झालेले आहेत.” असे आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे
व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे व तसेच महाविद्यालयाचे महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. माधव
सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.