एस.एस.जी.एम महाविद्यालयातील एन.एस.सी.चे कॅडेट्स बी आणि सी सर्टिफिकेट परीक्षेत उत्तीर्ण

0


कोपरगाव प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव महाविद्यालयातील शै. वर्ष २०२४ -२५ मध्ये एन.एस.सी.चे कॅडेट्सनी (एस. डब्ल्यू. आणि एस.डी.) बी सर्टिफिकेट आणि सी सर्टिफिकेट परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. सदर परीक्षेत ‘बी’ सर्टिफिकेट साठी ३३विद्यार्थी , ‘सी’ सर्टिफिकेट साठी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि विद्यार्थिनीमधून ‘बी’ सर्टिफिकेट साठी १८ आणि ‘सी’ सर्टिफिकेट साठी १३विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेल्या आहे.

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले, या प्रसंगी कॅडेट्सना महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे हस्ते ‘बी’ आणि ‘सी’ सर्टिफिकेट व प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले. या वेळी एन.सी.सी. कमांडर डॉ. चंद्रभान चौधरी व श्रीमती सय्यद एस.एम. मॅडम उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे व तसेच महाविद्यालयाचे महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. माधव सरोदे आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here