पोहेगांव प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील यांनी मराठवाडा निरीक्षक माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हा निरीक्षक मा.आ. चंद्रकांत दानवे यांच्या शिफारशीने छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेश शिवाजीराव पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण तांबे, विद्यार्थी शहराध्यक्ष सुशील बोर्डे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष अजिंक्य किर्दक, जिल्हा सरचिटणीस आरिफ खान, दस्तगीर शेख आदी उपस्थित होते.
या नियुक्ती बद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, सुधाकर सोनवणे माजी आमदार किशोर पाटील, माजी आमदार संजय वाघचौरे, द्वारकादास पात्रीकर, मुस्ताक अहेमद, रंगनाथ काळे, हरिश्चंद्र लघाने, विलास चव्हाण, इलियास किरमानी, शहर जिल्हा अध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, मोतीलाल जगताप, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले, महिला शहराध्यक्ष मेहेराज पटेल, युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रज्जाक पठाण, युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कुलदीप शिंदे, धनश्री तडवळकर, रवी तांगडे, योगेश देशमुख, राजेंद्र चव्हाण, सतीश देशमुख, गणेश मालकर, आनंद मगरे, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आदींनी त्यांचे अभिनंदन केले