ना क्लास ना ट्युशन घरीच अभ्यास करत मिळवले यश
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील कै धनाजी सजन जावळे यांची नात व गोविंदराव धनाजी जावळे यांची सुकन्या कु रिंकू गोविंदराव जावळे हिने अभियांत्रिकी सहाय्यक पदाची परीक्षा देत महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवत तसेच राज्यातून तेरावा नंबर मिळवत घवघवून यश संपादन केले नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी तिची निवड करण्यात आली. ‘ना क्लास ना ट्युशन’ जिद्द चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवत अनेक वेळा अपयश आले तरी न डगमगता स्पर्धा परीक्षा सुरू ठेवली. अखेर तिच्या मेहनतीला यश आले.
कु. रिंकू गोविंदराव जावळे हिने मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन मराठी माध्यमाच्या मुली देखील उच्च पदावर कार्यरत होऊ शकतात हे दाखवून दिले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी व कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयात पुर्ण केले.इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवत भविष्यात यशाला गवसणी घालणार असल्याचे त्यावेळेसच तिने स्पष्ट केले होते.
माध्यमिक शिक्षण कोपरगाव येथे एस एस जी एम कॉलेज मध्ये घेतले.नंतर अभियांत्रिकी शिक्षण संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये घेत पुढे एम बी ए फायनान्स व सप्लाय चेन फायनान्स चे शिक्षण घेत प्रथम क्रमांक मिळवला. एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षा देत अपयशाला सामोर जाऊन सलग पाच वर्ष अतोनात कष्ट घेऊन शेवटी तिला यश प्राप्त झाले. अभियांत्रिकी सहाय्यक पदाची परीक्षा देत महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक व राज्यातून तेरावा नंबर मिळवत तिने हे घवघवीत यश संपादन करत कुटुंबाचे व गावचे नाव रोशन केले.
नागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झाल्याने तिच्या कुटुंबाला मोठा आंनंद झाला. या यशाचा खुलासा करताना रिंकू जावळे येणे सांगितले की यशामागे आई वडील व कुटुंबीयांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. सलग पाच वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळत नव्हते मात्र तरीदेखील कुटुंबाचे प्रोत्साहन मला मिळत राहिले. त्यामुळेच आज मी हे यश संपादन करू शकले. रिंकू जावळे हिला मिळालेल्या याच्याबद्दल सोनेवाडी पंचक्रोशीतून तिचे अभिनंदन होत आहे