शिक्षक सारे मिटींगला ; विद्यार्थी मात्र वाऱ्यावर…..

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 देवळाली प्रवरा येथिल प्राथमिक शाळेतील 14 पैकी सात शिक्षक निवडणूक बीएलओ बैठकीसाठी तर दोन शिक्षक रजेवर असल्याने अवघ्या पाच शिक्षकांवर शाळा भरविण्यात आली असली तरी शिक्षक मिटींगला विद्यार्थी वाऱ्यावर सोडण्याची वेळ आल्याने संतप्त पालकांनी संताप व्यक्त करुन निवडणूकीचे काम महत्वाचे असल्याने चार ते पाच शिक्षकांनाच निवडणूकीचे काम दिल्यास शाळा भरविण्यास अडचण येणार नाही.राहुरी तहसिलदार यांनी काही शिक्षकांचे निवडणूक कामातून मुक्तता करावी आमची शाळा व्यवस्थीत चालविण्यास मदत करावी अशी मागणी येथिल पालकांनी केली आहे.

           देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना निवडणूकीची कामे दिली आहेत.14 पैकी 8 ते 9 शिक्षकांना निवडणूक कामे दिली.यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परीणाम झालेला दिसत आहे.24 आँगस्ट रोजी निवडणूक कामाची बीएलओ बैठक राहुरी तहसिल कार्यालयात असल्याने 8 ते 9 शिक्षक या बैठकीस गेल्याने व दोन शिक्षक रजेवर असल्याने 4 ते 5 शिक्षकांना शाळेतील 14 वर्ग सांभाळणे अवघड झाले आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी वाऱ्यावर सोडण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

             आमच्या पाल्यांना तरी शिकू द्या.निवडणूक काम महत्वाचे असले तरी सर्वच शिक्षकांना निवडणूक कामात समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परीणाम होत असल्याने काही शिक्षकांना निवडणूक कामात घेवून निम्म्या पेक्षा जास्त शिक्षक शाळेत ठेवल्यास दोन वर्गाला एक शिक्षक मिळाला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

            राहुरीच्या तहसिलदार यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी तरी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी राजेंद्र उंडे,अमोल भांगरे, सुनिल शेटे, किरण मोरे,आण्णासाहेब मोरे,बाबासाहेब बोरकर, नानासाहेब होले,सुनिल कांबळे आदींसह इतर पालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here