एस.एस.जी.एमच्या अभिजीत बाविस्करला वक्तृत्व स्पर्धेत ११००० रुपयांचे पारितोषिक

0


कोपरगाव – येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजचा SSGM college विद्यार्थी अभिजीत बाविस्कर याला ‘जलजीवन मिशन योजने’ अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळून रोख ११००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत दि.२३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत चंद्रकांत बाविस्कर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला व त्याला ११००० (अकरा हजार रुपये ) रोख बक्षीस व प्रमाणपत्र आशिष येरेकर ( IAS) जिल्हा प्रशासन अधिकारी अहमदनगर व जलजीवन मिशन प्रकल्प अधिकारी प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे , सौ.
चैतालीताई काळे, विवेक कोल्हे, सुनील गंगुले, महेंद्रकुमार काले, बाळासाहेब आव्हाड, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी अभिजीत बाविस्कर याचे हार्दिक
अभिनंदन केले.

सदर विद्यार्थ्यास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. बाबासाहेब शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. उज्ज्वला भोर, डॉ. अर्जुन भागवत, डॉ. बाबासाहेब वर्पे, प्रा. संजय शिंदे, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनीही बाविस्कर याचे कौतुक करून त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here