के. बी. रोहमारे महाविद्याची विद्यार्थीनी स्नेहल त्रिभुवन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २१०००/- रुपये प्रथम पारितोषिक

0

कोपरगांव: येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी कला शाखेतील कु. स्नेहल बापू त्रिभुवन या विद्यार्थीनीस जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ₹ २१००० चे पारितोषिक मिळाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. 

जानेवारी २०२४ मध्ये पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हातील अनेक महाविद्यालयांतील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. २७ मार्च रोजी संपन्न झाला.

यावेळी जिल्हा परिषद अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कु. स्नेहल बापू त्रिभुवन या विद्यार्थीनीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम २१०००, करंडक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कु. स्नेहल हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here