कोपरगाव नगरपालिकेने कोपरगावच्या जनतेला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा

0

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेने कोपरगावच्या जनतेला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल व सामाजिक कार्यकर्ते जलतज्ञ तुषार विद्वांस यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की आता नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. तसेच शेतीचे व बिगर सिंचनाचे मिळून एकूण चार आवर्तन सहा जून पर्यंत करण्याचे नियोजन नुकतेच नागपूर येथील अधिवेशनात माननीय पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या मिटींगला कोपरगावचे आमदार आशुतोष काळे तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते विवेक कोल्हे हे देखील उपस्थित होते . मिळणार आर्वतन हे सलग असल्यामुळे भविष्यात कोपरगाव नगरपालिकेला पाण्याची कुठलीही टंचाई भासणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेने कोपरगाव येथील नागरिकांना तीन दिवसात म्हणजेच आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्यास काहीही अडचण नाही या स्वरूपाचे मागणी आम्ही  केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here