चांदेकसारेच्या मातीत दुसऱ्यांसाठी जगण्याची प्रवृत्ती..: पवार गुरूजी

0

वयाच्या 92 व्या वर्षी माजी विद्यार्थ्यांकडून नागरी सन्मान

सोनेवाडी (वार्ताहर) :

चांदेकसारेची भूमी अनेक साधुसंतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली आहे. परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या विचाराने स्वाध्याय परिवार या भूमीत रुजला. भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार , न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, व्यसनमुक्ती चळवळ यासाठी बुजुर्ग ग्रामस्थांचे मला मोठे योगदान लाभले.सतत व्यायामाने नव्वदी पार केली असून नियमित व्यायाम व व्यसनावर लगाम घातला तर जीवन यशस्वी होईल.

स्वतःसाठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगता आले पाहिजे. गेल्या चार पीढ्यापासून चांदेकसारेचे ऋणानुबंध जपून ठेवले आहे.चांदेकसारेच्या मातीत दुसऱ्यांसाठी जगण्याची प्रवृत्ती असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक पवार गुरूजी यांनी केले.ते काल १९७३/७४ च्या बॅचने केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काशिनाथ होन होते.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक मुरलीधर धरम , भागवतराव गुरसळ, काळे कारखान्याचे संचालक शंकरराव  चव्हाण, कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर होन, सरपंच किरण होन, डॉ गोरक्षनाथ रोकडे,माजी सरपंच यादवराव पवार, निळकंठ होन, प्रा. रामदास होन, श्री टाकसाळ, प्रा. भगवान लोंढे, शिवसेना नेते भगीरथ होन, युवराज कुमावत, आर पी होन, प्रभूशंकर होन, जे के होन,सुनील होन,काशिनाथ होन , डॉ चांदगुडे, प्राध्यापक आमटे, शिवाजी पवार, मोहन होन , श्री गुजर, भिमाजी होन, विश्वनाथ होन अदी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रभूशंकर होन यांनी केले.माणिकराव पवार व मुरलीधर धरम यांचा ग्रामस्थांच्या वतीने व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराने दोन्हीही सेवानिवृत्त शिक्षक भाराहुन गेले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. रामदास पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here