ज्यांना जनतेने नाकारलं त्यांनी दुसऱ्या बद्दल बोलु नये : आमदार आशुतोष काळे 

0

कोपरगाव : ज्यांना तालुक्यातील मतदार जनतेने नाकारले त्यांनी दुसऱ्यावर बोलताना स्वतः कडे बघावे,, दुसऱ्यांवर खालच्या भाषेत भाष्य करायला आमच्यावर तसे संस्कार नाही, आपण वडीलधाऱ्यांचा नेहमी आदर करतो.  ज्यांच्याकडे ३५ अधिक ५ पाच अशी ४० वर्षे तालुक्याची सत्ता होती त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये काय दिवे लावले याचे उत्तर द्यावे. ते दुसऱ्यांविषयी बोलतात हेच मोठे हस्यासपद आहे.अशी  बोचरी टीका आमदार आशुतोष काळे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे नाव न घेता केली .ते कार्मीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या गळीत हंगाम सांगता प्रसंगी बोलत होते. 

आमदार काळे पुढे म्हणाले की, साखर कारखान्याची गळीत हंगाम सांगता कार्यक्रम हे काही राजकीय व्यासपीठ नाही मात्र जेष्ठ नेत्यांना हे अजूनही कळत नाही. ते जरी खालच्या स्तरावर जाऊन बोलले तरी आमची संस्कृती जेष्ठांबद्दल बोलण्याची नाही. तसे पहिले तर हयात नसलेल्या व्यक्ती बद्दल बोलू नये मात्र  ज्यांनी ३५ वर्षात भाम, भावली, मुकणे,कश्यपी , वैतरणा, कडवा, गौतमी आदि धरणाच्या नावावर जनतेला वेड्यात काढले. त्यांच्या वर बोलायला गेल्यावर दिवस ही पुरणार नाही अशी तिखट टीका आमदार काळे यांनी कोल्हे कुटुंबाचे नाव न घेता केली. संजीवनीच्या गळीत हंगामात बिपीन दादा कोल्हे  यांच्या  हजारो कोटीचे आकडे सांगणाऱ्यानी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी काय केले या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार काळे पुढे म्हणाले की  ५० वर्षांपूर्वी या योजनेचा काही कोटी असणारा खर्च आता ५० हजार कोटी रुपयांवर गेला आहे. या विषयाची ज्यांना माहितीच नाही त्यांच्या अज्ञाना बद्दल न बोललेलच बर. ! माजी आमदार अशोक दादा काळे यांनी विरोधी बाकावर असतानाही निधी आणला मात्र कोल्हे ४० वर्षे सत्तेत असताना निव्वळ भूल थापाच देत राहिले. सध्या आपल्या विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीही नाही . मात्र आता निवडणुका जवळ येऊ लागल्याने त्यांना कंठ फुटला असून त्यांना जनताच उत्तर देईल असेही काळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here