डॉ.बाबासाहेबांचा संदेश कृतीतून साकारा – अ‍ॅड.पटारे

0

वंचित बहुजन आघाडीतर्फे गुलमोहोर रोडवर जयंतीदिनी अभिवादन

     नगर –  तुम्ही जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही जर संघटित होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तरच न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना आज माणसुकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, डॉ.बाबासाहेबांचा हा संदेश कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड.लक्ष्मीकांत पटारे यांनी केले.

     सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडीतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड.लक्ष्मीकांत पटारे, योगेश साठे, शिरिष जानवे, सौ.प्रिया जानवे, सचिन गायकवाड, सागर भिंगारदिवे, अंकुश माळसमिंदर, प्रतिक जाधव, संदेश रणदिवे, प्रतिक साठे, ओम गाडे, केदार बल्लाल, प्रशांत शिंदे, बौद्धाचार्य दिपक पाटोळे, भाऊ पानमळकर, शुभम जगदाळे, ओमकार गंजी, अनुज पवार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय भेदभाव करणार्‍यांविरुद्ध लढा देऊन दलित समाजातील प्रत्येकाला मानाची शिकवण दिली. माणसाच्या मुक्तीसाठी मन, मस्तक आणि मनगटाचा मिलाफ घडवून बिनचेहर्‍यांचे आयुष्य जगत असलेल्या वंचितांना अस्मितेची ओळख मिळवून दिली. अशा या महामानवास त्रिवार अभिवादन आमची संघटना करते.

     प्रारंभी बौद्धाचार्य दिपक पाटोळे यांनी त्रिसरण पंचशील, भिमस्मरण, भिमस्तुती केली. याप्रसंगी प्रेम साठे, अमोल शिंदे, अतुल पवार, अविनाश वाघचौरे, शशिकांत दळवी, किरण चव्हाण, अक्षय शिंदे, माऊली दळवी, भिमदास कोकाटे, ज्ञानेश्वर वाघमारे, पोपट भालेराव, देवीदास भालेराव आदि उपस्थित होते.

——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here