थकबाकी वसुलीसाठी पालिकेने सील केलेले दुकान उघडले; गुन्हा दाखल

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

         नगरपरिषदेने थकबाकी पोटी सील केलेले  दुकानाचे परस्पर सील तोडून उघडण्यात आले. याबाबत गाळाधारक सुभाष गायकवाड यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदचे वसुली लिपिक सारंगधर पुंजाजी टिक्कल (वय ५४ रा. देवळाली प्रवरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, नगरपरिषद हद्दीतील बाजार तळावरील शेतकरी पुतळ्याजवळील व्यापारी संकुलातील दुकान गाळा क्र. १३ हा सुभाष जगन्नाथ गायकवाड यांच्या ताब्यात आहे.

           थकीत गाळा भाडे व मालमत्ता कराची थकबाकी थकलेली होती. थकबाकी वसुली होत नसल्याने दुकान गाळा क्र १३ हा सील करण्यात आला होता. दि. २९ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजे दरम्यान देवळाली प्रवरा नगरपरिषदचे करनिरीक्षक तुषार सुपेकर, कनिष्ठ अभियंता दिनकर पवार, लेखापाल कपिल भावसार, संगणक अभियंता भुषण नवाल,वसुली लिपिक  सारंगधर टिक्कल,शिपाई गोरख सरोदे यांनी सदर गाळ्याची थकबाकी वसुली करता सदर गाळा सील केला होता.

             दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी थकबाकी न भरताच दुकानदाराने  गाळ्याचे सील तोडून दुकाना उघडले असल्याचे दिसले.दुकानामध्ये प्रवेश करून नुकसान केलेले दिसून आले. याबाबत देवळाली प्रवरा नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी सदर गाळा धारकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गाळाधारक सुभाष जगन्नाथ गायकवाड, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. यांच्यावर गु.र.नं. ५०७/२०२४ भादंवि कलम ४२७, ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here