देवळाली प्रवरा येथे सर्व धर्मीय ईद मिलन व शीरखुर्मा कार्यक्रम संपन्न!

0

सामाजिक एकोपा कायम राखण्याचा संकल्प.पुन्हा एकदा प्रतिबिंबित झाला

देवळाली प्रवरा (वार्ताहर) 

        मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद च्या निमित्ताने येथील ईदगाह मैदानात सर्व धर्मीयां साठी ईद मिलन तथा शीरखुर्मा चा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. शहरातील मुस्लिम समाजाचे वतीने आयोजित या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत सर्व धर्मीय नागरिकांनी शीरखुर्माचा स्वाद घेत मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.वर्षानुवर्ष  देवळाली प्रवरातील जातीय सलोखा पुन्हा एकदा या निमित्त प्रतिबिंबित झाला आहे.

        देवळाली प्रवरा समाजिक एकोप्याची मोठी परंपरा आहे.येथे सर्व धर्मीय लोक गुण्या गोविंदाने  राहतात,एक दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतात.ही परंपरा कायम राहो अशी प्रार्थना रमजानच्या पवित्र ईद निमित्त आपण सर्व करू या अशी भावना माजी आमदार चंद्रशेखर कदम  यांनी यावेळी व्यक्त केली. भ्रमणभाषवरुन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी शुभेच्छा दिल्या.

        या वेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड , आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात,माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, काँग्रेस चे शहर अध्यक्ष  बाळासाहेब खांदे , माजी नगर सेवक अदिनाथ कराळे, सचिन ढूस, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष  सतीश वाळुंज, माजी नगरसेवक  बाळासाहेब खुरुद, आदर्श पतसंस्था अध्यक्ष  विष्णुपंत गिते, योग शिक्षक किशोर थोरात, राहुरी अर्बन चे अध्यक्ष  रामभाऊ काळे  युवा नेते  कृष्णा मुसमाडे,दीपक पठारे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष  केदारनाथ चव्हाण,वंचित चे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, साईनाथ बर्डे, एकलव्य संघटनेचे गीताराम बर्डे,कुमार भिंगारे,दत्तात्रय गडाख, हभप बाबासाहेब सांबारे,विठ्ठल टिक्कल,कांता पाटील, राजाभाऊ चव्हाण, अँड.  प्रशांत मुसमाडे, माजी  सैनिक प्रभाकर महांकाळ, चव्हाण, अमोल ढूस,उत्त्तर नगर जिल्हा पञकार हल्ला कृती समितीचे समन्वयक पत्रकार राजेंद्र उंडे, गणेश विघे,गणेश आंबिलवादे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, नानासाहेब उंडे,पप्पु चित्ते आदीसह शहरातील सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते.

       कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी  पत्रकार रफिक शेख,आकील बाबा पटेल, हाजी मुनीरभाई, मौलाना अल्लाउद्दीन,मौलाना अबूबकर,फिरोज शेख,अब्बास सय्यद,मेजर याकूब,शिराज सय्यद,नासिर तांबोळी, अल्ताफ शेख,आरीफ शेख, अय्युब शेख, मन्सूर शेख, हसन गुरुजी,आसिफ शेख, कयूम शेख, अल्ताफ इनामदार,आदिल इनामदार, असिफ सर,अकील बागवान, इम्रान शेख, शाकीर तांबोळी, सिकंदर शेख, अन्सार शेख,अरबाज शेख, इरफान शेख, फारुख शेख, फारुख पठाण, मन्सूरभाई बागवान,वसिम तांबोळी,वसिम शेख,मोसीन शेख, साहिल तांबोळी,भय्या भाई पेंटर, रिजवान शेख,जमीर सय्यद,आदिसह देवळाली प्रवरा शहरतील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here