राशिभविष्य /दिनविशेष /पंचांग

0

शके १९४५, शोभननाम संवत्सर, मंगळवार, दि. ११ जुलै २०२३, आषाढ कृष्ण नवमी, चंद्र- मेष राशीत,  नक्षत्र- अश्विनी, सुर्योदय- सकाळी ६ वा. ०९ मि. , सुर्यास्त-   सायं. १९ वा. १९ मि. 

नमस्कार आज चंद्र मेष राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज गुरु – चन्द्र युतीयोग व शनि –  चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आजचा दिवस मेष, मिथुन, कर्क, सिंह, तुला, धनु, मकर, कुंभ व मीन या राशीना अनुकूल तर वृषभ, कन्या व वृश्चिक  या राशींना प्रतिकूल जाईल.

  दैनंदिन राशिभविष्य

 मेष  : दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. नव्या उमेदीने कार्यरत राहाल. सकारात्मकपणे वागणार आहात. तुमचा प्रभाव वाढणार आहे.

वृषभ : कामाचा ताण होईल. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च कराल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल.

 मिथुन : आर्थिक लाभ होतील. काहींना विविध लाभ होतील. प्रवास होणार आहेत. मात्र, प्रवासात काळजी घ्यावी. प्रियजनांसाठी वेळ देवू शकणार आहात. आरोग्य सुधारेल.

कर्क : नवा मार्ग दिसेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील.

सिंह : नवी दिशा सापडेल. गेले दोन दिवस जाणवणारी अस्वस्थता संपेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : आत्मविश्‍वासाचा अभाव राहील. कामे रखडणार आहेत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. एखाद्याबाबतीत मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्य जपावे.

 तुळ : दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. तुमचा प्रभाव वाढणार आहे. सकारात्मकपणे कार्यरत रहाल. चिकाटी वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : खर्च वाढणार आहेत. दैनंदिन कामे विलंबाने मार्गी लागतील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल.

धनु  : तुमचा बौद्धिक प्रभाव असणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस अनुकूल जाईल. मनोबल वाढेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींना विविध लाभ  होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

मकर : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. चिकाटी वाढणार आहे. सकारात्मकपणे कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.

कुंभ : तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. नवा मार्ग दिसेल.

 मीन : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद लाभेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय,    सातारा- ९८२२३०३०५४ GARGI JYOTISHAALAYA: गार्गी ज्योतिषालय, सातारा

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here