वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुलांना फळांचे वाटप व मोफत आरोग्य तपासणी

0

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या एस जे एस रुग्णालयाचे कार्यकारी संचालक व आर जे एस फाउंडेशनचे सचिव प्रसाद कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ एप्रिल रोजी शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलामुलींना फळे वाटून त्यांच्या आरोग्याची तपासणी श्री जनार्दन स्वामी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.व त्याच दिवशी कोपरगाव बेट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यात वयोवृद्धापासून ते युवा पिढीने या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरात जवळपास पाचशेच्या अधिक लोकांनी लाभ घेतला.शिबिरात मोफत मेडीसिन वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचार मोफत करण्यात आले.

तसेच कोकमठाण येथील गोशाळेतील जनावरांना चारा प्रसाद कातकडे व त्यांच्या सह कुटुंबाच्या हस्ते दान देण्यात आला.त्याच दिवशी सकाळी एस जे एस रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत साईबाबा प्रसादाच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले. एस जे एस रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून व आर जे एस फाउंडेशन मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रसाद कातकडे यांच्यावर शुभेच्छांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वर्षाव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here