शिंगणापूर शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात  

0

कोपरगाव :       कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंगणापूर येथे शाळा पूर्व तयारी मेळावा(पहिले पाऊल) हा मेळावा अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उद्धाटन सहजानंदनगर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय महानुभाव व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवानराव संवत्सरकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत वाजत गाजत व फुलांच्या वर्षावात करण्यात आले.फुगे व फुलांच्या सजावटीने मुले हरखून गेली होती.मेळाव्यात मुलांसाठी खास सात स्टॅालची निर्मिती करण्यात आली होती.यामध्ये बौद्धिक,शारीरिक,सामाजिक,भाषिक,गणनात्मक,भावनात्मक विकासाशी निगडीत असे विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले गेले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आण्णासाहेब गुंजाळ यांनी केले.मुलांना शाळेबद्दल असणारी भीती दूर होऊन एक आनंददायी वातावरण निर्मिती होण्यासाठी व मुलांना शाळेची गोडी वाटावी यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख महानुभाव यांनी केले.

पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन मुलांचे स्वागत गुलाबपुष्प व खाऊवाटप करून करण्यात आले.याप्रसंगी मुलांसाठी खास तयार करण्यात आलेला सेल्फी पोईंट सर्वांचेच आकर्षण ठरत होता.तसेच यावेळी मिशन आरंभ अंतर्गत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रांचे महानुभाव यांच्या हस्ते वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक सचिन आढांगळे,देवराम खेमनर,किरण निंबाळकर,कैलास सोमासे,विद्या मैड,सुनिता मोरे,विजया जाधव,राजश्री पारखे,सुषमा निकाळजे,वैजयंती धावडे,स्तुती मिरजकर,यांनी प्रयत्न केले.सदर मेळाव्याप्रसंगी समिती सदस्य,माता-पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आढांगळे यांनी केले तर देवराम खेमनर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here