अतिरेक ..

0

शास्त्रज्ञ  प्रयासाथक

दिसती गोजीरी फळे

आधुनुकीकरण भले

नवदिशा तेज उजळे

मोबाईल  संगणकाने

संधीचे अस्मान खुले

आत्मसात करी ज्ञान 

लीलया आजची मुले

जिम्मेदारीपालकांची

घातक अतिरेक टाळे

प्रवेश  निषिद्ध मानून

लावायचे सरळ टाळे

बांध ना घाले प्रवाहा

विदारक वळण वळे

जलपर्णी  जोरा वाढे

अशुध्द चवदार  तळे

कधी  सामोपचाराने

कधीअडवा बळेबळे

फैलावी  ती बांडगुळे

बनवू  नकात  दुबळे

विस्पारूनि रे नजरा

अधू बनती  ते डोळे

बुध्दी बने परावलंबी

बुध्दीमान होती खुळे

– हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996..

 www.kavyakusum.com

2

रेडीओ ..

ट्रांझिस्टर रेडिओचे

आधी केवढे  प्रस्थ

करमवणूकी साधने

नव्हती तेंव्हा जास्त

कितीवेळ ऐकायचे

किती कडक शिस्त

सर्वाधिकार वडिलां

जबाबदारीचीभिस्त

आई साठी दुपारची

वेळ सोयीची स्वस्थ

बिनाका गीत  माला

कार्यक्रम जबरदस्त

सुधानरवणे बातम्या

सांगायच्या रे  मस्त

अश्लील नसे काही

करेल असे अस्वस्थ

रेडीओ संख्या कमी

ऐकाया येती त्रयस्थ

एकत्र बसून सुस्वाद

घ्यायचे कुटुंबग्रहस्थ

रेडिओ बंद पडलेला

करेना  कुणी दुरुस्त

मोबाईल टीव्हीमध्ये

झालेत सगळे व्यस्त

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here