संजीवनी एमबीएच्या ११ विध्यार्थ्यांची बजाज फायनान्समध्ये नोकरीसाठी निवड

0

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी

कोपरगाव:  आपल्याला संजीवनी मधुन एमबीए Sanjeevani MBA पुर्ण केल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळणारच, या विश्वासाने  विद्यार्थी संजीवनीच्या एमबीए विभागात प्रवेश  घेतात. ही विश्वासाहर्ता  सार्थ ठरविण्यासाठी संजीवनी एमबीएचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग (टी अँड पी) आपले विद्यार्थी विविध कंपन्यांच्या कसोटीत उतरण्यासाठी त्यांना कंपनी निहाय प्रशिक्षण देतो. याचीच फलनिष्पत्ती  म्हणुन बजाज फायनान्स कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये संजीवनी एमबीएच्या ११ विध्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी एमबीएच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
         संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले. तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ११ पैकी उपस्थित असलेल्या ६ विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज अँड  एमबीएचे डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, संजीवनी इन्स्टिट्युट  ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर, टी अँड  पी विभागाचे डीन डॉ. विशाल  तिडके, समन्वयक डॉ. शामराव घोडके व प्रा. अतुल मोकळ उपस्थित होते.
        बजाज फायनानस कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये हेमंत सुनिल चोपडा, विनायक रामचंद्र गवारे, प्रशांत अशोक  घोडे, अक्षय कल्याण गुरसळ, शुभम बाळासाहेब जावळे, अभिषेक  दिगंबर लभडे, आकाश  साहेबराव मगर, निलेश  संजय परदेशी , अभिषेक  रविंद्र शहाणे, वैभव बाजीराव शिंदे  व अक्षय सुनिल तिरसे यांचा समावेश  आहे. मागील वर्षी  एमबीए विभागाच्या १००  टक्के विध्यार्थ्यांना टी अँड  पी विभागामार्फत नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  देण्यात आल्या होत्या. चालु वर्षीही  याच दिशेने  वाटचाल सुरू असल्याचे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here