देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालूक्यात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र अज्ञात चोरट्यांनी चक्क मालवाहतूक करणारा ट्रक चोरून नेल्याची घटना राहुरी शहर हद्दीत दिनांक १८ सप्टेंबर रोजी घडलीय. राहुरी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.
रिजवान युनूस सय्यद, वय ३३ वर्षे, राहणार ता. खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. हा ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रकमध्ये भाडे घेऊन राहुरी येथे आला होता. माल खाली केल्या नंतर दिनांक १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजे दरम्यान रिजवान सय्यद याने त्याच्याकडील साडेतीन लाख रूपये किंमतीचा ट्रक क्रमांक एम एच १८ बि जी ९९७५ हा ट्रक राहुरी शहर हद हद्दीतील वाय एम सी मैदानावर लावला होता. त्यावेळी अज्ञात चोरटे तो मालवाहतूक ट्रक घेऊन पसार झाले होते. रिजवान सय्यद यांनी ट्रक चा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो दिसून आला नाही.
रिजवान युनूस सय्यद याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा रजि. नं. ९५४/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शहामद शेख हे करीत आहेत.